व्हॅलेंटाइन डे ला पत्नीच्या अफेअरचा झाला खुलासा, आधी पत्नीला दिलं गिफ्ट मग केली हत्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 11:45 IST2021-02-27T10:51:12+5:302021-02-27T11:45:33+5:30

Wife murder by husband in Gurugram : पोलिसांच्या क्राइम यूनिटने सांगितले की, १४ फेब्रुवारीला रात्री उशीरा ३० वर्षीय रूबीच्या हत्येप्रकरणी तिचा पती सतीश याला अटक करण्यात आली आहे.

Gift given to wife on valentine day after few hours murder by husband Gurugram | व्हॅलेंटाइन डे ला पत्नीच्या अफेअरचा झाला खुलासा, आधी पत्नीला दिलं गिफ्ट मग केली हत्या....

व्हॅलेंटाइन डे ला पत्नीच्या अफेअरचा झाला खुलासा, आधी पत्नीला दिलं गिफ्ट मग केली हत्या....

व्हॅलेंटाइन डे च्या पती त्याच्या पत्नीसाठी गिफ्ट घेऊन आला आणि नंतर थोड्या वेळाने घराबाहेर गेला. जेव्हा तो परत आला तेव्हा पत्नी घरात नव्हती. पती तिला इकडे-तिकडे शोधत होता. अशात त्याला ती तिच्या प्रियकरासोबत दिसली. त्याने रागात तिथेच पत्नीचा गळा दाबला (Wife murder by husband in Gurugram) आणि तिची हत्या केली. पतीला शुक्रवारी अटक करण्यात आली. ही धक्कादायक घटना हरयाणाच्या गुरूग्राममध्ये घडली.

पोलिसांच्या क्राइम यूनिटने सांगितले की, १४ फेब्रुवारीला रात्री उशीरा ३० वर्षीय रूबीच्या हत्येप्रकरणी तिचा पती सतीश याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला संशय होता की, त्याची पत्नी दुसऱ्या पुरूषाला फोन करून बोलत राहते. सतीशला संशय होता की, पत्नी रूबीचं अफेअर सुरू आहे. यामुळे त्याने पत्नीची हत्या केली. 

सतीश आणि रूबीचं लग्न ८ वर्षांआधी झालं होतं. लग्नानंतर त्यांना दोन मुलंही आहेत. पण यानंतर संशयाने दोघांमध्ये दरी निर्माण झाली. सतीशने १४ फेब्रुवारीला पत्नीला गिफ्ट दिलं. गिफ्ट दिल्यावर सतीश काही कामासाठी घराबाहेर गेला. परत आला तेव्हा पत्नी रूबी घरात नव्हती. रूबी कुठे असेल याचा अंदाज घेत तो त्याच ठिकाणी पोहोचला. तिथे तिघांमध्ये वाद इतका पेटला की, सतीशने पत्नी रूबीचा तिथे गळा दाबून तिची हत्या केली.

संशयामुळे पत्नीची हत्या करण्याची गेल्या महिन्यातील ही दुसरी मोठी घटना आहे. एका घटनेत पतीने पत्नीवर संशय असल्याने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गरम पाण्याने तिचा चेहराही जाळण्याचा प्रयत्न पतीने केला होता.
 

Web Title: Gift given to wife on valentine day after few hours murder by husband Gurugram