गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 'कोरियन लव्हर' या ऑनलाईन गेमच्या नादात तीन बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांना आपल्या भावना व्यक्त केल्या. "सॉरी, आम्ही कोरिया सोडू शकत नाही. कोरिया आमचं आयुष्य आणि आमचा जीव आहे. आम्ही ते सोडू शकत नाही..." असे आपल्या तीन मुलींचे शेवटचे शब्द असल्याचं वडिलांनी सांगितलं.
गाझियाबादमधील 'भारत सोसायटी'च्या नवव्या मजल्यावर राहणाऱ्या चेतन यांचं संपूर्ण कुटुंब आता उद्ध्वस्त झालं आहे. एका कोरियन ऑनलाईन गेमने त्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं आहे. त्यांच्या तिन्ही मुलींनी या गेमच्या 'डेथ ट्रॅप'मध्ये अडकून आपलं जीवन संपवलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना चेतन सांगतात की, त्यांनी आपल्या मुलींची शेवटची सुसाईड नोट पोलिसांना दिली. त्यात 'पप्पा सॉरी' असं लिहिलं होतं.
जीवघेणा 'कोरियन लव्हर' गेम! प्राची बनली 'डेथ कमांडर'; फोनमध्ये दडलंय 'शेवटच्या टास्क'चं रहस्य
"आई-वडिलांनी मुलांना गेम खेळू देऊ नये"
ढसाढसा रडत चेतन आता प्रत्येक आई-वडिलांना विनंती करत आहेत की, आपल्या मुलांना ऑनलाईन गेमपासून दूर ठेवा. ते म्हणतात, "हे खूपच वाईट झालं आहे. असं कोणाच्याही मुलांच्या बाबतीत होऊ नये. मुलांनी गेम खेळणं सोडावं. कृपया, आई-वडिलांनी आपल्या मुलांना गेम खेळू देऊ नये. गेममध्ये कधी कोणता टास्क दिला जातो, हे कळतंच नाही. आम्हाला देखील काहीच समजलं नाही."
"कोरियातून एक लिंक आली"
तिन्ही मुलींना नक्की कोणत्या गेमचं व्यसन होतं, या प्रश्नावर चेतन सांगतात की, त्यांना याबद्दल पूर्ण माहिती नाही. त्यांना कोरियातून एक लिंक आली होती. मुलींचे फोन सध्या पोलिसांकडे आहेत, तेच आता सविस्तर माहिती काढतील. "मला जर माहित असतं की त्यांना कोणता टास्क दिला जात आहे, तर मी त्यांना गेमच खेळू दिला नसता" असे हताश उद्गार त्यांनी काढले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : Ghaziabad father loses three daughters to suicide after a Korean online game. He pleads with parents to keep children away from online games, unaware of deadly tasks. The police are investigating.
Web Summary : गाजियाबाद में एक पिता ने कोरियन ऑनलाइन गेम के कारण तीन बेटियों को खो दिया। उन्होंने माता-पिता से बच्चों को ऑनलाइन गेम से दूर रखने की गुहार लगाई, क्योंकि उन्हें घातक कार्यों का पता नहीं था। पुलिस जांच कर रही है।