शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

घाटकोपर हिरे व्यापारी हत्याकांडप्रकरणी आणखी एकास डोंगरीतून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 9:00 PM

सिद्धेश शंकर पाटील (वय 23) असे अटक आरोपीचे नाव असून उदानीला ज्या तिघांनी मारहाण केली, त्या कटात पाटीलचाही सहभाग होता. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. पाटीलला पंतनगर पोलिसांनी डोंगरी येथून अटक केली आहे.

ठळक मुद्देपाटीलला पंतनगर पोलिसांनी डोंगरी येथून अटक केली आहे.   उदानीसोबत झालेल्या झटापटीत उदानी यांची हत्या झाली.  या बदल्यात निखतला हिंदी मालिकेत भूमिका देण्याचे कबूल करण्यात आले होते

मुंबई - घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्याकांडप्रकरणी पंतनगर पोलिसांनी आज आणखी एकास अटक केली. सिद्धेश शंकर पाटील (वय 23) असे अटक आरोपीचे नाव असून उदानीला ज्या तिघांनी मारहाण केली, त्या कटात पाटीलचाही सहभाग होता. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. पाटीलला पंतनगर पोलिसांनी डोंगरी येथून अटक केली आहे.   उदानी हत्याकांडप्रकरणी यापूर्वी निखत खान उर्फ झारा खान (वय 20), शाईस्ता खान ऊर्फ डॉली (वय 41)आणि महेश भोईर (वय 31), सचिन पवार, पोलिस दिनेश पवार आणि चालक प्रणीत भोईर या सहा जणांना अटक झाली आहे. हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांची हत्या न करता त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांचा अश्‍लील व्हिडीओ बनवून त्या मार्फत उदानी यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा कट सचिन आणि दिनेश यांचा होता. या दोघांनी मिळून हा कट महिन्याभरापूर्वी शिजवला होता.त्याची जबाबदारी दिनेश यांच्यावर सोपविण्यात आली होती, मोबदल्यात त्याला मोठी रक्कम मिळणार होती. उदानीला हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी शाहिस्ता खान मध्यस्थीने निखत खानचा वापर करण्यात येणार होता. या बदल्यात निखतला हिंदी मालिकेत भूमिका देण्याचे कबूल करण्यात आले होते अशी माहिती उघडकीस येत आहे. मात्र या कटाचा हनीट्रॅप वाटेतच फसला. त्यानंतर दिनेश पवार, महेश भोईर व सिद्धेश पाटील यांनी उदानीला मारहाण केली. उदानीसोबत झालेल्या झटापटीत उदानी यांची हत्या झाली.  

पनवेलचा महेश प्रभाकर भोईर, बारबाला निखत ऊर्फ झारा मोहम्मद खान हिच्यासह सायीस्ता सरवर खान ऊर्फ डॉली यांना मंगळवारी अटक करण्यात आली. झारा ही डॉलीच्या मामाची मुलगी आहे. डॉलीच्या सांगण्यावरुन झारा ही सचिनच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. उदानी यांच्या अपहरणाआधी मुख्य आरोपी सचिन पवार याने विक्रोळीच्या टागोरनगर येथे आरोपींची भेट घेतली होती. तेथून तो राजकीय पक्षाच्या बैठकीला निघून गेला.अपहरणासाठी वापरलेल्या कारमध्ये झारा आणि प्रणीत भोईर होता. पुढे घणसोली परिसरात दिनेश हा महेश आणि अन्य साथीदारांसह कारमध्ये चढले. त्यांनी उदानी यांची हत्या केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणातील दिनेश आणि प्रणितला कोठडीसाठी मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दिनेशने पोलिसांनी मारहाण केल्याचे नाटक केले. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याने दोघांनाही १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कपड्यांचाही शोध घेणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.  

 

टॅग्स :MurderखूनKidnappingअपहरणArrestअटकPoliceपोलिसGhatkoparघाटकोपर