शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

फोन करण्यास मोबाइल न दिल्याने घाटकोपरमध्ये तरुणावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 1:36 PM

पळून गेलेल्या या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये प्रणेश चंद्रकांत डुंबरे आणि हिमनाथ गोळे यांचा समावेश आहे.

मुंबई – फोन करण्यास मोबाइल दिला नाही म्हणून रागाच्या भरात दोन तरुणांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य भा. दं. वि. कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये प्रणेश चंद्रकांत डुंबरे आणि हिमनाथ गोळे यांचा समावेश आहे.

प्रणेय हा कल्याण येथे राहतो. काल रात्री दोन वाजता तो त्याच्या बाईकवरून मित्र हिमनाथसोबत जात होता. घाटकोपर येथील एमएसएस रोड, डॉ. चौबे हॉस्पिटलजवळ येताच दोन्ही आरोपी तरुणांनी त्याला आवाज देऊन थांबविले. एका तरुणाने घरी फोन करायचा आहे असे सांगून प्रणेयकडे मोबाइल मागितला. मात्र, प्रणेयने त्याला मोबाईल देण्यास नकार दिला. याच कारणावरून या दोघांनी प्रणेयशी वाद घालून त्याच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला.

यावेळी हिमनाथने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर या दोघांनी हल्ला केला. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी तेथून पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना तातडीने पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. प्रणेयच्या जबानीवरून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह अन्य भा. दं. वि.  कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGhatkoparघाटकोपरMobileमोबाइल