शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! बहिणीच्या प्रेमात पडला पती, आधी जबरदस्तीने केला गर्भपात नंतर पत्नीला मागितला घटस्फोट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:13 IST

Bihar : राणी तिचं माहेर झारखंडच्या चतराहून गुरूवारी सासरी पोहोचली. इथे पोहोचल्यावर तिला सासरे, दीर आणि घरातील स्टाफने मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. 

बिहारच्या(Bihar) गयामधून(Gaya) एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या मावस बहिणीच्या नादापाई आपल्या पत्नीला घटस्फोट मागितला आहे. पंजाबी कॉलनीतील नितिन लालने २०१६ मध्ये राणी कुमारीसोबत विधिवत लग्न केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, राणी तिचं माहेर झारखंडच्या चतराहून गुरूवारी सासरी पोहोचली. इथे पोहोचल्यावर तिला सासरे, दीर आणि घरातील स्टाफने मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. 

पीडिता रात्रभर घराबाहेर बसून होती. तिने इंटरनेटवरून फोन नंबर शोधून डीजीपी, आयजी, एसएसपी, डीएसपीसहीत इतर ही अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच व्हॉट्सअॅपवर त्यांना व्हिडीओही पाठवला. तिला वाटलं कुणीतरी आलं तर तिला रात्रभर रस्त्यावर रहावं लागलं नसतं. पण कुणीच आलं नाही. कडाक्याच्या थंडीत तिने रात्र घराबाहेर काढली. (हे पण वाचा : धक्कादायक! आपल्याच वडिलांच्या प्रेमात पडली मुलगी, आई अन् ९ वर्षीय बहिणीच्या हत्येसाठी केली मदत....)

सकाळ होताच पीडिता राणी कुमारी व्हिडीओ घेऊन गया एसएसपी ऑफिसमध्ये पोहोचली आणि इथे तिने कारवाईसाठी अर्ज केला. राणी कुमारीने सांगितले की, ती चतराहून आपल्या सासरी सकाळी १० वाजता पोहोचली. पण घराला कुलूप होतं. मग तिने सासऱ्यांच्या दुकानात चावी मागितली. तर तिला मारहाण करण्यात आली. तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिने पूर्ण रात्र बाहेरचं काढली. (हे पण वाचा : धक्कादायक! विवाहित महिलेचे अनेकांसोबत होते अनैतिक संबंध, त्यातील एकाने रचला मर्डरचा प्लॅन कारण....)

पीडितेने सांगितले की, तिची सख्ख्यी मावस बहीण शिल्पी गुप्तासोबत तिचा पती नितीन लालचं अफेअर सुरू आहे. याची खबर तिला लग्नाच्या काही दिवसातच लागली होती. पण नंतर दोघांमध्ये असं ठरलं की, ते दोघे पुन्हा कधी बोलणार नाही. पण दोघांचं अफेअर सुरूच होतं आणि ते ४ व्हीलरची डिमांड करत आहेत.

पीडितेने सांगितले की, तिच्या वडिलांनी आपली सर्व जमीन विकून तिचं लग्न करून दिलं होतं. यादरम्यान घराखाली असलेल्या लाल नर्सिंग होममध्ये तिचा जबरदस्ती गर्भपात करण्यात आला. याबाबत पीडितेने २०१९ मध्ये पोलिसात तक्रारही दिली होती. पण तेव्हा काहीच कारवाई झाली नाही.

तेच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सायंकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी पाहिलं की, मुलाकडच्या लोकांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद करून ठेवला आहे. त्यांना समजावलं की, सुनेला घरात घ्या. पण त्यांनी काही ऐकलं नाही. नंतर पोलिसांनी महिलेचे सासरे, दीर आणि इतर ३ लोकांना ताब्यात घेतलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDivorceघटस्फोटmarriageलग्नBiharबिहार