पत्र, दोन डायऱ्या अन् व्हिडीओ क्लिप...मुलांना संपवून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी ठरली कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:54 IST2025-08-02T18:53:53+5:302025-08-02T18:54:18+5:30
गुजरातमध्ये एका शिक्षकाने दोन मुलांना संपवून स्वतः टोकाचं पाऊल उचललं आहे.

पत्र, दोन डायऱ्या अन् व्हिडीओ क्लिप...मुलांना संपवून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी ठरली कारण
Gujarat Crime:गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली. एका ४१ वर्षीय शिक्षकाने आपल्या दोन्ही मुलांना विष देऊन मारल्यानंतर स्वतःही गळफास लावून घेतला. पत्नी काही कामानिमित्ताने बाहेर गेलेली असतानाच शिक्षकाने टोकाचे पाऊल उचललं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. आत्महत्येपूर्वी शिक्षकाने एक आठ पानी चिठ्ठी लिहीली होती. या चिठ्ठीतून त्याच्या पत्नीचे बाहेर विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पत्नी फाल्गुनी तिचा पती अल्पेश सोलंकीशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण कोणीही फोन उचलला नाही, त्यानंतर ती घरी गेली. घर आतून बंद होते. त्यानंतर तिने तिच्या भावाला फोन केला आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांना घरात प्र दोन्ही मुलांचे मृतदेह आणि अप्लेश सोलंकी पंख्याला लटकलेले आढळले. घटनास्थळावरून उंदीर मारण्याचे विषही सापडले आहे. अल्पेशने आधी मुलांना विष दिले आणि त्यानंतर त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली.
कल्पेश सोलंकी पांडेसरा येथील मेरी माथा पब्लिक स्कूलमध्ये शारीरिक शिक्षण शिकवत असे, तर फाल्गुनी सुरत जिल्हा पंचायतीत लिपिक आहे. दोघांचेही वडील सुरतमध्ये पोलिसात होते, त्यामुळे दोघांचीही पोलिस कॉलनीत ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. कुटुंबांनी सहमती दर्शवली आणि त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले झाली. तपासादरम्यान, पोलिसांना काही फोटो सापडले ज्यात दोघांनीही एकमेकांच्या खांद्यावर टॅटू काढला होता.
तपासानंतर पोलिसांनी अल्पेशची फाल्गुनी आणि तिचा प्रियकर नरेश राठोड यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. नरेश आणि फाल्गुनी दोघेही जिल्हा पंचायत कार्यालयात एकत्र काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मृत्यूपूर्वी अल्पेशन आठ पानांची सुसाईड नोट, २०० पानांच्या दोन डायरी आणि तीन व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज बनवल्या होत्या. या सगळ्यात त्याने नेमकं काय काय घडलं हे लिहून ठेवलं होतं.
अल्पेशने सुसाईड नोटमध्ये त्याने त्याच्या पत्नीचे कृषी विस्तार अधिकारी नरेश राठोड यांच्याशी असलेल्या प्रेमसंबंधांबद्दल लिहिले होते. दोन डायरींपैकी एक त्याच्या पालकांसाठी आणि भावंडांसाठी होती तर दुसरी त्याच्या पत्नीवर होती. अल्पेशने त्याच्या बालपणीच्या आठवणी डायरीत लिहिल्या होत्या. त्याने हे देखील लिहिले की तो फाल्गुनीच्या प्रेमात पडला आणि नंतर त्यांनी लग्न केले. फाल्गुनीला अनेक संधी देऊनही तिने तिच्या प्रियकरासोबतचे प्रेमसंबंध संपवले नाहीत. फाल्गुनी गेल्या काही वर्षांपासून त्याचा मानसिक छळ करत होती.
फाल्गुनीचा प्रियकर आधीच विवाहित होता आणि त्याला पहिल्या लग्नापासून एक मूल आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले,पण ते नातेही तुटले. यानंतर, त्याने फाल्गुनीशी प्रेमसंबंध सुरू केले. अल्पेश फाल्गुनीच्या प्रेमसंबंधामुळे खूप नाराज होता. त्याने फाल्गुनीचा पाठलागही सुरू केला होता. फाल्गुनीचे सिम कार्ड अल्पेशच्या नावावर होते. त्यामुळे त्याने फाल्गुनीचे कॉल डिटेल रेकॉर्डही पाहिले होते. अल्पेशने सुसाईड नोटमध्ये दुसरे मूल त्याचे नसल्याचीही शंका व्यक्त केली. अल्पेशला संशय होता की राठोड शहराबाहेर गेल्यावर त्यांच्या घरी येत असे.
फाल्गुनी राठोडने दिलेले नवीन कपडे घरी आणायची. अल्पेशने असाही आरोप केला की फाल्गुनी त्याच्या दिसण्याबद्दल त्याला अनेकदा टोमणे मारत असे. फाल्गुनी त्याला सांगायची की तू इतक्या सुंदर मुलीशी लग्न करण्यासाठी भाग्यवान आहे. जेव्हा अल्पेशला त्याच्या फाल्गुनीच्या प्रेमसंबंधाबद्दल कळले तेव्हा तो दारू आणि सिगारेट पिऊ लागला. जून महिन्यापासून त्याने डायरी लिहायला सुरुवात केली होती.