शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्या : सनातन साधक मुख्य आरोपीचे औरंगाबाद कनेक्शन उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:46 IST

या पूर्वी अनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर आणि  साहित्यीक गोविंद पानसरे खूनप्रकरणात औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे.

ठळक मुद्देऋषिकेशमूळचा सोलापूरचा होता, मात्र  २०१२ पासून तो औरंगाबादमध्ये राहत असेसनातनचे पूर्णवेळ काम करण्याचे सांगून सोडले औरंगाबाद

औरंगाबाद:  ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात औरंगाबाद कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. कर्नाटक विशेष तपास पथकाने(एसआयटी) गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी ऋषिकेश देवडीकर हा औरंगाबादेतील एन-९ भागात राहत होता. या पूर्वी अनिसचे नरेंद्र दाभोळकर आणि  साहित्यीक गोविंद पानसरे खूनप्रकरणात औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह डॉ. नरेंद्र दाभोळकर, साहित्यीक गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात एटीएस, सीबीआयने औरंगाबादेतील शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना अटक केली. हे दोन्ही संशयित सध्या कारागृहात आहेत. महाराष्ट्रातील नामवंत विचारवंताचा खूनप्रकरणात औरंगाबादचे नाव आल्याने शहरात खळबळ उडाली होती. या घटनेचा विसर पडतच असताना कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश खूनप्रकरणात एसआयटीने औरंगाबादच्या ऋषिकेश देवडीकरला शुक्रवारी अटक केली.

ऋषिकेशमूळचा सोलापूरचा होता, मात्र  २०१२ पासून तो  सिडको एन-९ मध्ये यशवंत शुक्ला यांच्या घरात  भाडेकरू म्हणून आई-वडिल,पत्नी, आणि सात वर्षाच्या मुलीसह  राहण्यास आला होता. ऋषिकेशने येथे आल्यानंतर पतंजलीचे साहित्य विक्रीचा घरातून व्यवसाय सुरू केला. ग्राहक वाढत असल्याचे पाहून त्याने एन-९,एम-२ रोडवर जगदीश कुलकर्णी यांचा गाळा भाड्याने घेऊन संस्कृती स्वदेशी साहित्य नावाने दुकान सुरू केले. येथे दुकान चालवित असताना तो सनातनचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असे. सनातनने आयोजित कार्यक्रमात त्याचा सक्रिय सहभाग असे, अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली. 

सनातनचे पूर्णवेळ काम करण्यासाठी सोडले शहर 
ऋषिकेशचे दुकान जोरात सुरू असताना सनातन संस्थेचे पूर्णवेळ काम करायचे आहे, असे सांगून दुकानमालक कुलकर्णी यांना सांगून त्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याने दुकान बंद केले. दुकानातील मालासह कुलकर्णी यांनी त्याचे दुकान चालवायला घेतले. यानंतर ऋषिकेश पत्नी आणि मुलीला घेऊन गोव्यातील आश्रमात जायचे आहे, असे सांगून गल्लीतील लोकांना आणि आईवडिलांना औरंगाबादेतून गेला. यानंतर तो औरंगाबादला नाही. त्याचे वृद्ध आई-वडिल एप्रिल २०१९ मध्ये शुल्का यांचे घर सोडून मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या मुलाकडे राहण्यास गेले आहेत. 

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशArrestअटकSanatan Sansthaसनातन संस्थाPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद