गेट वे ऑफ इंडिया येथे रंगला पोलीस बॅण्डचा दिमाखदार संचलन सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 21:52 IST2019-10-31T21:51:29+5:302019-10-31T21:52:50+5:30
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी पोलीस अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

गेट वे ऑफ इंडिया येथे रंगला पोलीस बॅण्डचा दिमाखदार संचलन सोहळा
मुंबई - राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आज सायंकाळी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाकडून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ‘पोलीस बॅण्ड डिस्प्ले’हा सोहळा दिमाखदारपणे पार पडला. वाद्यवृन्द विभागाने कौशल्यपूर्ण सादरीकरण करीत उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्तसंजय बर्वे आदी पोलीस अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.