‘लाइव्ह’ मीटिंगमध्येच गॅस एजन्सी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; व्यावसायिक तणाव झाला असह्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:42 IST2026-04-09T14:02:31+5:302026-04-09T14:42:21+5:30
उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल

‘लाइव्ह’ मीटिंगमध्येच गॅस एजन्सी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; व्यावसायिक तणाव झाला असह्य
लोकमत न्यूज नेटवर्क, तामलवाडी (जि. धाराशिव): व्यावसायिक तणाव आणि गॅस सिलिंडरच्या साठ्यातील मोठ्या तफावतीच्या पार्श्वभूमीवर, तुळजापूर तालुक्यातील काटी येथील एका ‘एचपी’ गॅस वितरकाने ऑनलाइन बैठकीतच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माळी असे या वितरकाचे नाव असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एचपी गॅस कंपनीच्या वतीने वितरकांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. ऑनलाइन बैठक सुरू असतानाच, ज्ञानेश्वर माळी यांनी अचानक गळ्यात दोरी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. १,२०० सिलिंडरची तफावत कंपनीने केलेल्या प्राथमिक तपासणीत माळी यांच्याकडील उपलब्ध स्टॉक आणि प्रत्यक्षात झालेले वितरण यामध्ये तब्बल १,२०० गॅस सिलिंडरची तफावत आढळून आली आहे. याच आर्थिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.