गँगस्टर पुजारीला अटक, घबराहट मात्र कलानी समर्थकात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 19:26 IST2022-04-15T19:25:33+5:302022-04-15T19:26:36+5:30

Gangster Suresh Pujari : गुंड सुरेश पुजारी कोणकोणाचे नाव घेणार, चर्चेला उधाण

Gangster priest arrested, panic but Kalani supporters | गँगस्टर पुजारीला अटक, घबराहट मात्र कलानी समर्थकात 

गँगस्टर पुजारीला अटक, घबराहट मात्र कलानी समर्थकात 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : गँगस्टर सुरेश पुजारी याला उल्हासनगरपोलिसांनी अटक करताच शहरातील खंडणीसत्र बाबत पुजारी कोणकोणाचे नाव घेणार. याबाबत चर्चेला उधाण आले असून कलानी समर्थकात घबराहट पसरल्याचे बोलले जात आहे. 

उल्हासनगर भाजपचे शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी पक्षाचे नेते ओमी कलानी यांच्या फँटरचे नाव गँगस्टर सुरेश पुजारी याने घेतले. असा आरोप करून खळबळ उडून दिली होती. पोलिसांनी या दिशेने तपास करण्याची मागणी आमदार आयलानी यांनी केली होती. याच दरम्यान सोशल मीडियावर सुरेश पुजारी याने पंकज त्रैलोकोनी याच्यासह तिघा सोबत खास संबंध असल्याची क्लिप व्हायरल झाली होती. तर ओमी कलानी यांनीही कुमार आयलानी यांच्यासह भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यावर आरोप केले होते.

उल्हासनगर पोलिसांनी गुरवारी गँगस्टर सुरेश पुजारी याला शहरातील खंडणीसत्र व केबलचालक सचु कारीरा यांच्या हत्ये प्रकरणी ताब्यात घेतल्याचे बोलले जात असून त्याच्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात असलेला गँगस्टर सुरेश पुजारी हा पोलीस तपासात कोणकोणाचे नाव घेतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुजारीच्या अटकेने कलानी समर्थकासह इतरा मध्ये घबराहट पसरल्याची चर्चा शहरात रंगली आहे. तपासा दरम्यान पोलीस कोणाकोणाला बोलावितात. याबाबत ही चर्चा रंगली आहे. सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड याबाबत तपास करीत आहेत. याबाबत त्यांच्यासी संपर्क केला असता तपास सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Web Title: Gangster priest arrested, panic but Kalani supporters