गँगस्टर एजाज लकडावालाच्या भावाला अटक; 50 लाखांची खंडणी मागितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 20:15 IST2019-03-01T20:13:39+5:302019-03-01T20:15:22+5:30

मुंबई - बांधकाम व्यावसायिकाला 50 लाखांच्या खंडणीसाठी दूरध्वनी करून धमकवल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गँगस्टर एजाज लकडावालाच्या भावाला अटक ...

Gangster Ejaz Lakdawala's brother arrested; Ransom of 50 lakhs was sought | गँगस्टर एजाज लकडावालाच्या भावाला अटक; 50 लाखांची खंडणी मागितली

गँगस्टर एजाज लकडावालाच्या भावाला अटक; 50 लाखांची खंडणी मागितली

मुंबई - बांधकाम व्यावसायिकाला 50 लाखांच्या खंडणीसाठी दूरध्वनी करून धमकवल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गँगस्टर एजाज लकडावालाच्या भावाला अटक केली. आरोपी मीरा रोड येथे वास्तव्याला असून गुन्हेगारी कारवायांसाठी भावाच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 
अकील युसूफ लकडावाला असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम उपनगरातील एका बांधकाम व्यावसायिकाला गँगस्टर एजाज लकडावाला डिसेंबर 2018 पासून धमकावत होता. त्यानंतर त्या बांधकाम व्यावसायिकाने आंतरराष्ट्रीय दूरध्वनी उचलणे सोडल्यानंतर 27 फेब्रुवारीला त्यांना स्थानिक व्यक्तीकडून खंडणीसाठी दूरध्वनी करण्यात आला होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली असता अकीलचा या प्रकरणात हात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अकीलला  आज अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 

Web Title: Gangster Ejaz Lakdawala's brother arrested; Ransom of 50 lakhs was sought