दोन सख्खे भाऊ मुलीवर करत राहिले गॅंगरेप, गर्भवती झाली तर औषध देऊन दोघेही फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 18:46 IST2021-07-06T18:43:49+5:302021-07-06T18:46:32+5:30
Rape in Kanpur : पीडिता प्रेग्नेंट झाल्यावर तिला अबॉर्शनसाठी औषधही दिलं होतं आणि त्यामुळे तिला रक्तस्त्राव सुरू झाला होता. तब्येत जास्त गंभीर झाल्याने मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

दोन सख्खे भाऊ मुलीवर करत राहिले गॅंगरेप, गर्भवती झाली तर औषध देऊन दोघेही फरार
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून (Gang Rape in Kanpur) गॅंगरेपची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे दोन सख्ख्या भावांनीच (Two brother Gang Raped girl) हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. दोघेही सध्या फरार आहेत. पोलीस आरोपींचा जागोजागी शोध घेत आहेत. दोन सख्ख्या भावांनी मुलीला धमकावत तिच्यावर वारंवार गॅंगरेप केला. इतकंच नाही तर पीडिता प्रेग्नेंट झाल्यावर तिला अबॉर्शनसाठी औषधही दिलं होतं आणि त्यामुळे तिला रक्तस्त्राव सुरू झाला होता. तब्येत जास्त गंभीर झाल्याने मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
दोन सख्ख्या भावांनीच केलं हे घाणेरडं कृत्य
पीडित परिवाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गॅंगरेपचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचे वडील म्हणाले की, गॅंगरेपनंतर आरोपींनी कुणाला काही न सांगण्याची धमकी दिली होती. त्यासोबतच दुष्कर्म करताना आरोपींनी व्हिडीओही रेकॉर्ड केला आणि त्याद्वारे ते मुलीला ब्लॅकमेल करत होते. नंतर मुलगी गर्भवती झाली आणि गर्भपातासाठी त्यांनी तिला औषध दिलं होतं. ज्यानंतर तिची तब्येत बिघडली. (हे पण वाचा : फेक फेसबुक 'लव्हर'च्या नादात महिलेने घेतला स्वत:च्या बाळाचा जीव, आता धक्कादायक सत्य आलं समोर....)
पीडितेचा चुलत भाऊ म्हणाला की, त्याच्या बहिणीला घरात एकटं पाहून गावातील दोन तरूण तिला तलावाकडे उचलून घेऊन गेले आणि तिच्यावर रेप केला. तेच याप्रकरणी एसपी आदित्य कुमार शुक्ला म्हणाले की, एक मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गावातील दोन तरूणांवर रेपची एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.