संतापजनक! मानलेल्या भावानेच आधी जबरदस्ती भरलं तिच्या भांगेत कुंकू, मग मित्रांसोबत मिळून केला गॅंगरेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:23 AM2022-01-28T11:23:27+5:302022-01-28T11:24:35+5:30

Surat Gang Rape : पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिला शिकून काहीतरी बनायचं होतं. लग्न टाळण्यासाठी ती तिच्या नातेवाईकाच्या ओळखीच्या एका तरूणासोबत दीड वर्षाआधी सूरतला पळून आली होती.

Gangrape on minor girl, police arrested 3 person in Surat Gujarat | संतापजनक! मानलेल्या भावानेच आधी जबरदस्ती भरलं तिच्या भांगेत कुंकू, मग मित्रांसोबत मिळून केला गॅंगरेप

संतापजनक! मानलेल्या भावानेच आधी जबरदस्ती भरलं तिच्या भांगेत कुंकू, मग मित्रांसोबत मिळून केला गॅंगरेप

Next

गुजरातच्या (Gujrat) सूरतमध्ये (Surat Gang Rape) अल्पवयीन मुलीसोबत गॅंगरेपची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन मुलीचा मानलेला भाऊ असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने आधी जबरदस्ती मुलीच्या भांगेत कुंकू भरलं आणि नंतर आपल्या मित्रांसोबत मिळून गॅंगरेप केला. पीडितेने सूरतच्या डिंडोली पोलीस स्टेशनमध्ये तिन्ही आरोपींविरोधात गॅंगरेपचा गुन्हा दाखल केला.

असं सांगितलं जात आहे की, पीडितेचे आई-वडील आरोपीसोबतच तिचं लग्न लावून देणार होते. पण ती यासाठी तयार नव्हती आणि तिने पोलिसात तक्रार दिली. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिला शिकून काहीतरी बनायचं होतं. लग्न टाळण्यासाठी ती तिच्या नातेवाईकाच्या ओळखीच्या एका तरूणासोबत दीड वर्षाआधी सूरतला पळून आली होती. तेव्हापासून ती तरूणाला आपला मानलेला भाऊ म्हणत होती. मग अचानक या मानलेल्या भावाने अल्पवयीन मुलीच्या भांगेत कुंकू भरलं आणि आपली पत्नी बनवून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवू लागला.

पीडितेचा आरोप आहे की, तरूणाने तिला त्याच्या मित्रांकडे सोपवलं आणि एका रिकाम्या घरात तिच्यासोबत गॅंगरेप करण्यात आला. पीडितेचा असाही आरोप आहे की, तिने आधीही पोलिसात तक्रार  दिली होती. पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. डिंडोली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. कोरोना गाइडलाईननुसार तिघांची मेडिकल टेस्ट केली जाईल आणि रिपोर्ट आल्यावर कारवाई केली जाईल.

याप्रकरणी सूरतचे एसीपी सीके पटेल म्हणाले की, एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना तिचं लग्न करून द्यायचं होतं. त्यासाठी ते मुलगा शोधत होते. पण अल्पवयीन मुलीला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे ती तिच्या ओळखीच्या तरूणासोबत घरातून पळून गेली होती. तो या घटनेचा मुख्य आरोपी आहे. तो मुलीची मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत वेगळ्या रूममध्ये राहत होता आणि तिच्यासोबत पतीसारखा व्यवहार करू लागला होता. त्याने जबरदस्ती तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल.
 

 

Web Title: Gangrape on minor girl, police arrested 3 person in Surat Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.