Gang raped in hamirpur minor girl and brutelly killed after gangrape pda | निर्भया पुन्हा बळी पडली; नराधमांनी केला सामूहिक बलात्कार अन् पाना तोंडात कोंबून केली हत्या 

निर्भया पुन्हा बळी पडली; नराधमांनी केला सामूहिक बलात्कार अन् पाना तोंडात कोंबून केली हत्या 

ठळक मुद्देनिर्भयाच्या दोषींना २० मार्चला फाशी दिली आणि या घटनेला १ आठवडा देखील उलटला नसताना दुसरी निर्भयाला सामूहिक बलात्कारालाच्या घटनेला सामोरे जावे लागले आहे. या दुर्दैवी प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा आहे.

हमीरपूर - निर्भयाच्या दोषींना फासावर चढवल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील हमीरपुरमध्ये एक धडकी भरवणारा घटना घडली आहे. या परिसरात काही नराधमांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने पोलिसांची देखील झोप उडाली आहे. 

निर्भयाच्या दोषींना २० मार्चला फाशी दिली आणि या घटनेला १ आठवडा देखील उलटला नसताना दुसरी निर्भयाला सामूहिक बलात्कारालाच्या घटनेला सामोरे जावे लागले आहे. हमीरपूर येथे चिकासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली. क्रूरतेची हद्द पार करत या नराधमांनी अल्पवयीन पीडित मुलीच्या तोंडात लोखंडी पाना घालून हत्या केली. 

नराधमांनी अल्पवयीन विद्यार्थिनी एकटी घरी असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीचे आई - वडील शेतात काम करत होते.ज्यावेळी शेतातून आई - वडील घरी परतले त्यावेळी चित्र भयानक होते. सायंकाळी उशिरा आई - वडील घरी आले तेव्हा रस्त्याच्या थारोळ्यात पडलेली आपली लेक पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घाईघाईने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यांत पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस अधिकारी हृदयाला चटके देणाऱ्या या घटनेबद्दल काहीही स्पष्टपणे बोलत नाही आहेत. 

इंटरनेट, व्हायग्रा, फेक कॉल्स... लैंगिक शक्तीच्या नावावर लुटत होती मुंबईतील टोळी

पत्नीने थोड्या वेळात पोहोचण्याचे कळविले; पण नग्न अवस्थेत सापडला मृतदेह

 

ही भयानक घटना घडवून आणून नराधम फरार झाले आहेत. तर जिल्ह्यातील पोलिसांनी घटनास्थळी तळ ठोकला आहे, पोलीस विभागातील उच्च अधिकारी गावातच आरोपींचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा आहे.

Web Title: Gang raped in hamirpur minor girl and brutelly killed after gangrape pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.