गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 18:08 IST2020-04-04T18:03:43+5:302020-04-04T18:08:37+5:30

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Gang rape on a girl, revealing shocking incident after becoming pregnant pda | गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

ठळक मुद्देसातही जणांना पोलिसांनी अटक केली असून अलिबाग न्यायालयाने त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉक्टरांनी तपासले असता, पीडित मुलगी गर्भवती असल्याचे तिच्या कुटूंबियांना डॉक्टरांनी सांगितले.

निखिल म्हात्रे


अलिबाग : गतिमंद मुलीवर सात जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार करत पीडीत मुलीस गरोदर केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे घडली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सातही जणांना पोलिसांनीअटक केली असून अलिबाग न्यायालयाने त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 


अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गावात पीडित मुलगी आपल्या आई वडीलांसोबत राहत आहे. ही मुलगी थोडी गतीमंद आहे. तीच्या परिसरात राहणाऱ्या सात जणांनी या मुलीच्या फायदा घेऊन सात महिने वारंवार आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीची तब्येत बिघडून त्रस जाणवू लागला. यासाठी पीडित मुलीच्या घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेले.


डॉक्टरांनी तपासले असता, पीडित मुलगी गर्भवती असल्याचे तिच्या कुटूंबियांना डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून यामध्ये परिसरातील सात जणांनी पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. रेवदंडा पोलीसांनी सात जणांना त्वरीत अटक करीत त्या सात आरोपींवर  बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्र वारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अलिबाग पोलीस उपाधिक्षक सोनाली कदम करीत आहेत.

Web Title: Gang rape on a girl, revealing shocking incident after becoming pregnant pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.