शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव पठार येथे एकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी हत्यारासह जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:06 IST

दहीहंडीच्या दिवशी व्यक्तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले.

ठळक मुद्देकात्रज घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना लुटण्याकरिता थांबल्याची आरोपींची कबुली

पुणे : आंबेगाव पठार येथे एकावर  हत्याराने वार करुन त्याचा खुन करणाऱ्या पाच आरोपींना ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पूड, दोरी व दोन मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.   करण सुरेश शिंदे (वय 23), मितेश सुरेश शिंदे (वय 29, दोघेही रा. जैन मंदिर, कात्रज), विशाल मोहन बोराने (वय 25, रा.बर्वे. ता.भोर), अमित सुनील भोरडे (वय 21, रा.दत्तनगर, शिवांजली बिल्डींग, कात्रज) आणि शंभुराजे जालिंदर कोंडे (वय 21, रा.बर्वे, भोर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडीच्या दिवशी आंबेगाव पठार येथे एकावर खुनी करुन फरार झालेले आरोपी हे कात्रज घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना लुबाडण्याकरिता लपून बसल्याची माहिती  भारती पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस निरीक्षक सुबराव लाड व त्यांच्या सहका-यांना गस्त घालताना मिळाली. त्यांनी ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांना कळवली. त्यांनी सहाका-यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि आरोपींना पकडण्याकरिता सापळा रचला.  पोलिसांना निसर्ग हॉटेलपुढील रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या दाट झाडीत लपून बसलेले आरोपी वाहनांच्या दिव्याच्या उजेडात दिसले. यावेळी दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपींना धारदार हत्यारासह पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कात्रज घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना लुटण्याकरिता थांबल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण 55 हजार 710 रुपये किंमतीच्या वस्तु जप्त करण्यात आले. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णु ताम्हाणे, तसेच पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, सचिन पवार, राहुल तांबे यांनी केली.  आरोपींची सखोल तपासणी केली असता त्यांनी दहीहंडीच्या दिवशी अशोक मारुती भुरुक (रा.साईप्रसाद सोसायटी, शिवसाई बिल्डींग, आंबेगाव पठार) नावाच्या व्यक्तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड हे करीत आहेत. 

टॅग्स :katrajकात्रजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकtheftचोरी