Gang arrested who ready to robbing on the petrol pump | पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

पिंपरी : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला दिघी पोलिसांनीअटक करून दरोड्याचा डाव उधळून लावला. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री अकराच्या सुमारास भोसरी-आळंदी रोडवर दिघी येथे घडली . 
 कुंडलिक देवराम शेखरे (वय २४), रामेश्वर सोपान पांचाळ (वय २८), शुभम विठ्ठल निर्मळे (वय २२), रुपेश ज्ञानेश्वर देवकर (वय २४), गजानन प्रेमराव फाजगे (वय १९) व दयानंद महादेव सुरवसे (वय १९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई गणेश कोकणे यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी आळंदी रस्त्यावर काहीजण उद्यानाच्या समोर दुचाकीवर संशयितरित्या थांबले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीची तपासणी केली असता त्यामध्ये घातक हत्यारे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी तीन दुचाकी, दोन तलवारी, एक लोखंडी पालघन, तीन लोखंडी कोयते, सहा मास्क असा एकूण ८१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता ते भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याची कबुली त्यांनी दिली. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Gang arrested who ready to robbing on the petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.