गणेश नाईक यांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 08:38 AM2021-03-26T08:38:30+5:302021-03-26T08:39:27+5:30

Sankalp Naik beaten by locals in Talavli: दुचाकीने धडक दिल्यावर नाईक व त्यांचा मित्र गाडीतून खाली उतरले व दुचाकीस्वाराला उचलले. त्याचे नाव विचारले असता त्यांनी प्रवीण रघुनाथ लिहे असे नाव सांगितले.

Ganesh Naik's grandson Sankalp Naik beaten near Malshej Ghat | गणेश नाईक यांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण

गणेश नाईक यांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

टोकावडे : माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh naik) यांचे नातू संकल्प संजीव नाईक (Sankalp Sanjeev Naik) व त्यांचे मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह मंत्री हे दोघे कृषी केंद्र शोधण्यासाठी माळशेज घाटाच्या दिशेने जात होते. तळवली गावाजवळ आले असता तेथून त्यांनी गाडी पुन्हा मागे फिरवली. त्याचवेळी पाठीमागून आलेला दुचाकीस्वार धडकला. दरम्यान, तेथे असलेल्या नीलेश देसले व त्याच्या तीन साथीदारांनी संकल्प, तेजेंद्रसिंग यांना शिवीगाळ करत मारहाण केली. (Ganesh Naik Grandson Sankalp Naik beaten by two wheeler driver)

दुचाकीने धडक दिल्यावर नाईक व त्यांचा मित्र गाडीतून खाली उतरले व दुचाकीस्वाराला उचलले. त्याचे नाव विचारले असता त्यांनी प्रवीण रघुनाथ लिहे असे नाव सांगितले. हनुमान हॉटेल जवळ नीलेश व तीन साथीदारांनी मारहाण केली. या प्रकरणी देसले याच्यावर टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून इतर तिघांचा तपास सुरू आहे या घटनेत तेजेंद्रसिंग यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली.

Web Title: Ganesh Naik's grandson Sankalp Naik beaten near Malshej Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.