गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील आराेपीचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 10:40 AM2021-07-17T10:40:26+5:302021-07-17T10:40:32+5:30

Gaepal Agarwal Murder Case : आराेपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

Gaepal Agarwal Murder Case : bail plea rejected of accused | गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील आराेपीचा जामीन फेटाळला

गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील आराेपीचा जामीन फेटाळला

Next

अकाेला : बाेरगाव मंजू येथे खदान असलेले व्यावसायिक गाेपाल हनुमानप्रसाद अग्रवाल यांची गाेळ्या झाडून हत्या करणाऱ्या एका आराेपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. या आराेपीने गुन्हा केला नसल्याची कबुली अटकेत असलेल्या साथीदारांनी दिली हाेती. मात्र आराेपीचा या हत्याकांडात सहभाग असल्याच्या कारणावरून त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. गणेश हरीषचंद्र कराळे असे जामीन अर्ज फेटाळलेल्या आराेपीच नाव आहे. गाेपाल हनुमंतप्रसाद अग्रवाल ४५ यांच्या बंधूची बाेरगाव मंजू येथे गिट्टी खदान आहे. या गिट्टी खदानवर व्यवस्थापक असलेले गाेपाल यांनी काही कामगारांचे काम याेग्य नसल्याने त्यांना कामावरून कमी केले हाेते. या कारणावरून तसेच त्यांच्याकडील दाेन लाख रुपयांची राेकड लुटण्याच्या बेतात असलेल्या टाेळीने त्यांच्यावर दि. २६ डिसेंबर २०२० राेजी गाेळ्या झाडून त्यांची हत्या केली हाेती. गाेपाल अग्रवाल यांचा वाढदिवस असलेल्या दिवशीच त्यांची हत्या केल्याने आराेपींचा त्यांच्यावर प्रचंड राग असल्याचेही पाेलीस तपासात समाेर आले हाेते. चार गाेळ्या झाडल्यानंतरही आराेपींनी त्यांच्या डाेक्यावर दगडाने हल्ला करीत त्यांना जागेवरच मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला; या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला हाेता.

याप्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, आम्स ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला हाेता.

 

आराेपीचा पिस्तूल देण्यात हाेता सहभाग

गणेश कराळे याने या हत्याकांडातील मुख्य आराेपीला पिस्तूल पाेहाेचविण्याचे काम केले हाेते. याच पिस्तूलमधून चार गाेळ्या झाडण्यात आल्या हाेत्या. आराेपी हा घटनेपासून फरार असून, सहभाग नसल्याचे कारण समाेर करीत अटकपूर्व जामिनासाठी धावपळ करीत हाेता, मात्र आराेपीचा शुक्रवारी जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या आराेपीविरुद्ध वारंवार पकड वाॅरंटही जारी करण्यात आला आहे.

Web Title: Gaepal Agarwal Murder Case : bail plea rejected of accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.