"हॅलो, माझी सून हॉटेलच्या ४४३ रुममध्ये…"; सासऱ्याने टीप दिली अन् पोलिसांनी धाड टाकताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:08 IST2025-08-06T10:03:31+5:302025-08-06T10:08:00+5:30
सासऱ्याने दिलेल्या माहितीनंतर गुजरात पोलिसांनी मद्य पार्टी करणाऱ्या सूनेला अटक केली.

"हॅलो, माझी सून हॉटेलच्या ४४३ रुममध्ये…"; सासऱ्याने टीप दिली अन् पोलिसांनी धाड टाकताच...
Gujarat Liqueur Party Raid:गुजरातमध्ये दारूबंदी असतानाच, सुरतमध्ये एक दारू पार्टी पकडण्यात आली आहे. सुरतमधील डुमास येथील वीकेंड अॅड्रेस हॉटेलच्या रूम नंबर ४४३ मध्ये दारू पार्टी सुरू होती. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि चार पुरुष आणि दोन महिलांना पकडले. हे लोक दारू पार्टी करत होते. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे येथे दारू पार्टी करणाऱ्या महिलेच्या सासऱ्याने पोलिसांना याची माहिती याची दिली आणि सर्वांना पकडवून दिलं. सासऱ्याने पोलिसांना फोन करुन सगळा प्रकार सांगितला.
पतीशी झालेल्या भांडणानंतर, एक पत्नी तिच्या मित्रांसोबत पार्टी करत होती. फ्रेंडशिप डेच्या दिवशी हॉटेलच्या खोलीत मित्रांसोबत दारूची पार्टी करत होती. पण तिला माहित नव्हते की तिचा फ्रेंडशिप डे साजरा करणे लवकरच एका गुन्ह्यात ठरेल. गुजरातमधील डुमास येथील वीकेंड अॅड्रेस हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यानंतर हॉटेलच्या एका खोलीत ४ पुरुष आणि २ मुली दारूची पार्टी करत होते. यानंतर, सर्वांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी हॉटेलमधून २३ ते २५ वयोगटातील चार पुरुष आणि दोन मुलींना अटक केली. हे सर्वजण हॉटेलच्या खोलीत दारूची पार्टी करत होते. पार्टी करणाऱ्या महिलांपैकी एकीच्या सासऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. होते. सासऱ्यानेच त्यांची सून हॉटेलमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत दारू पार्टी करत असल्याची माहिती दिली. सासऱ्याने सुरत पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की त्यांची सून हॉटेलच्या रूम नंबर ४४३ मध्ये दारू पार्टी करत आहे. त्यानंतर डुमास पोलिसांनी छापा टाकून महिलेला दारूच्या बाटल्यांसह पकडले. अटक केलेल्या दोन्ही मुली कलाकार आहेत, तर चारही पुरुष व्यावसायिक आहेत.
हॅलो... पोलिस नियंत्रण कक्ष! साहेब... माझी सून एका हॉटेलमध्ये दारूची पार्टी करत आहे. तिला थांबवा, असं सासऱ्याने पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा छापा टाकला तेव्हा सर्व आरोपी दारूच्या नशेत होते. पोलिसांनी चार ग्लास आणि दारूची अर्धी भरलेली बाटली जप्त केली. आरोपींनी फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी हॉटेलची खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांनी सर्वांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांची रक्त तपासणी केली तेव्हा त्यांच्या रक्तामध्ये अल्कोहोल असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याच्या सुनेचा तिच्या पतीशी काही वाद होता. तिचे तिच्या पतीशी पटत नव्हते. म्हणून सासरच्यांनी त्यांच्या सुनेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या सुनेचा पाठलाग केला आणि नंतर त्यांना दारू पार्टीची माहिती पोलिसांना दिली. पार्टीची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना फोन केला.