शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला फसविणाऱ्या भामट्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 19:29 IST

मुंबई -  इन्स्टाग्रामवर झालेली ओळख मैत्रीत बदलली. नंतर मैत्रीत पडून लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अशा प्रकारे 21 वर्षीय तरुणाने गोडीगुलाबीने 15 वर्षाच्या मुलीला आपल्या जाळय़ात ओढले. त्याने ...

ठळक मुद्दे21 वर्षीय तरुणाने गोडीगुलाबीने 15 वर्षाच्या मुलीला आपल्या जाळय़ात ओढलेअल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करून उलट तिलाच फसविण्याचा प्रयत्न केलाडोंगरी पोलिसांनी २१ वर्षीय भामट्याला बेड्या ठोकल्या

मुंबई - इन्स्टाग्रामवर झालेली ओळख मैत्रीत बदलली. नंतर मैत्रीत पडून लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अशा प्रकारे 21 वर्षीय तरुणाने गोडीगुलाबीने 15 वर्षाच्या मुलीला आपल्या जाळय़ात ओढले. त्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तो तिला खंडणीसाठी धमकावू लागला. त्याने अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करून उलट तिलाच फसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोंगरी पोलिसांनी २१ वर्षीय भामट्याला बेड्या ठोकल्या.

जुलै महिन्यात डोंगरी परिसरात राहणाऱ्या मंजू (वय 15) (बदललेले नाव) या मुलीची भायखळ्यात राहणाऱ्या मेहफुज मन्सुरी (वय 21) या तरुणाशी इन्स्टाग्रामवर परिचय झाला. त्यानंतर दोघांमध्ये नियमित चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगनंतर त्यांची गाढ मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गोडीगुलाबीने मेहफुजने मंजुला आपल्या जाळ्यात ओढले. मग वेगवेगळी आमिषे दाखवून मेहफुजने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केली. त्यावेळी तिला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याने मंजूसोबत व्हिडीओ आणि फोटो काढले. काही दिवस मेहफुजने तिच्याकडे 14 हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे दे नाहीतर तुझे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल करेन अशी धमकी देऊ लागला. यामुळे घाबरलेल्या मंजूने घडला प्रकार पालकांना सांगून डोंगरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. नंतर मंजूच्या तक्रारीनुसार डोंगरी पोलिसांनी बलात्कार, खंडणी आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मेहफुज अन्सारीला अटक करण्यात आली. मेहफुज बारावीपर्यंत शिकलेला असून बेरोजगार आहे. मेहफुजने मंजूच्या गैरफायदा घेत तिचे लैंगिक शोषण करण्याबरोबर पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार वेळीच उघडकीस आला आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणArrestअटकSocial Mediaसोशल मीडिया