शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पिंपरीत उसने दिलेल्या पैशांचा तगादा लावल्याने मित्रांनीच केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 8:08 PM

हातउसने दिलेल्या या रकमेसाठी तगादा लावल्याने मित्राने रुमालाने गळा आवळून तरूणाचा खून केला.

ठळक मुद्देसौताडा घाटात मृतदेह टाकला: वाकड पोलिसांनी केली गुन्हाची उकल

पिंपरी : मैत्रिणीच्या नावावर असलेल्या फ्लॅटवर कर्ज काढून ती रक्कम मित्राला वापरण्यास दिली. मात्र, हातउसने दिलेल्या या रकमेसाठी तगादा लावल्याने मित्राने रुमालाने गळा आवळून तरूणाचा खून केला. मृतदेह अहमदनगर जिल्हयातील जामखेडजवळील सौताडा घाटात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अठरा दिवसांत तपास करून वाकड पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला असून दोघांना अटक केली आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस सुनील भिसे (वय २८, रा. रहाटणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दत्ता नवनाथ बिरंगळ (वय ३०, रा. नेवाळेवस्ती, चिखली, मूळ - सोनेगाव, ता. जामखेड, जि. नगर) आणि समाधान बिभीषण भोगल (वय २४, रा. जाधववाडी, चिखली, मूळ - बोरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. तेजस भिसे हा जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचे काम करत होता. त्याने त्याच्या मैत्रिणीच्या नावावर चिखली येथे असलेल्या फ्लॅटवर बँकेतून कर्ज घेतले. ती रक्कम त्याने दत्ता याला हातउसने वापरण्यासाठी दिले. परंतु, ती रक्कम दत्ता याने वेळेत परत न केल्याने बँकेचे हप्ते भरणे बंद झाले. कर्जफेडीसाठी बँकेने तेजस आणि त्याच्या मैत्रिणीकडे तगादा लावला. यामुळे तेजस दत्ताकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता तेजस धुळे, अमरावती येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. नंतर त्याने त्याचा मावसभाऊ नितेश अंबादास भोरे याला फोन करून सांगितले की, तो दत्ता बिरंगळ याच्यासोबत आहे. २१ एप्रिल रोजी तेजस जी मोटार घेऊन गेला होता ती मोटार काळेवाडी येथील भोईर लॉन्स जवळ चावीसह सोडली असल्याचा मॅसेज नितेशच्या मोबाईलवर आला. परंतु, तेजस घरी न आल्याने तसेच त्याच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्याचा भाऊ प्रवीण सुनील भिसे (वय २९) यांनी वाकड पोलिस ठाण्यात तेजस हरविल्याची तक्रार नोंदविली. दत्ता बिरंगळ याने २२ एप्रिलला दुपारी फोन बंद केला. त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यावरून बिरंगळ याच्या विरोधात तेजसच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर वाकड पोलिसांनी कसून तपास केला आणि दत्ता आणि समाधान या दोघांना पकडले. त्यानंतर दोघांनी खूनाची कबूली दिली. मोटारीतून जात असताना जामखेड येथे रुमालाने गळा आवळून तेजसचा खून केला.  मृतदेह नगरजवळील सौताडा घाटामध्ये ६० फुट दरीत फेकून दिला. तेजसचे कपडे, बेल्ट, बूट व इतर साहित्य राजुरी येथे जाळल्याची कबूली दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, ज्ञानेश्वर साबळे, फौजदार हरीश माने, सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले, रमेश गायकवाड, जावेद पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJamkhedजामखेडPoliceपोलिसMurderखून