दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:16 IST2025-10-15T16:13:31+5:302025-10-15T16:16:12+5:30
दुर्गापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी वासिफ अली याला पोलिसांनी अटक केली आहे, सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. वासिफला न्यायालयात हजर करण्यात आले आहे आणि पोलिसांनी रिमांड अर्ज दाखल केला आहे.

दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
काही दिवसापूर्वी बंगालमधील दुर्गापूर येथील एका मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीनीर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ती तरुणी तिच्याच एका मित्रासोबत बाहेर गेली होती. यावेळी तिच्यावर अत्याचार झाले होते. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी तिच्याच एका मित्राला अटक केली आहे.
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
तरुणीचा मित्र आरोपी वासिफ अलीला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. यामुळे आतापर्यंत या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष व्यवस्थेअंतर्गत रुग्णालयात पीडितेचा जबाब गुप्तपणे नोंदवण्यात आला. त्यानंतरच, मालदा येथील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी वासिफ अलीला अटक करण्यात आली.
या प्रकरणी विद्यार्थिनीने सांगितले की, एका वर्गमित्राने तिला कॉलेजबाहेर नेऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तीन तरुण आले, त्यापैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोन तरुण आले आणि त्यांनी विद्यार्थिनीचा मोबाईल फोन परत करण्यासाठी तीन हजार रुपये मागितले, तिने नकार दिल्यावर त्यांनी मोबाईल फोन घेतला आणि निघून गेले.
वडिलांनी आधीच तिच्या मित्रावर आरोप केले होते
पीडितेच्या वडिलांनी पहिल्या दिवसापासूनच वर्गमित्रावर आरोप केले होते. त्याचे नावही आरोपी म्हणून घेतले होते. पोलिसांनी त्याची चार दिवस चौकशी केली, अगदी घटनेच्या ठिकाणी नेले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. वडिलांना पोलिस तपासावर विश्वास नाही आणि त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आज वासिफला दुर्गापूर न्यायालयात हजर करण्यात आले आणि पोलिसांनी रिमांड अर्ज दाखल केला.
शुक्रवारी रात्री ही घटना घडली, ज्यावेळी विद्यार्थिनी तिच्या वर्गमित्रासह जेवणासाठी कॉलेजमधून बाहेर पडली. यावेळी ते जंगलाजवळ येताच, तीन तरुण तिथे आले. थोड्याच वेळात आणखी दोघे आले. त्यानंतर वर्गमित्र पळून गेला.