friend raped on sleeping girl in the night party | पार्टीत झोपलेल्या तरुणीवर मित्राचा बलात्कार

पार्टीत झोपलेल्या तरुणीवर मित्राचा बलात्कार

पुणे : पार्टीत दारू पिल्याने थकून हॉलमध्ये झोपलेल्या तरुणीवर मित्राने बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे़. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
कॉग गोगाई (रा़. वाघोली) असे त्याचे नाव आहे़. ही घटना हांडेवाडी रोडवरील डायनामिक लिनिया सोसायटीत १३ ऑक्टोबरला पहाटे घडली़. 
याप्रकरणी फुरसुुंगी येथील एका ३१ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हडपसर येथील एका कंपनीत काम करणारे तरुण तरुणी व त्यांचे मित्र हे नेहमीप्रमाणे शनिवारी १२ ऑक्टोबरला रात्री डायनामिक लिनिया सोसायटीत पार्टी करण्यासाठी जमले होते़. फिर्यादी व तिचे मित्रमैत्रिणींबरोबरच कॉग गोगोई हाही या पार्टीत आला होता़. पार्टीत सर्वांबरोबर ही तरुणीनी दारु पिली़. दारुची झिंग जास्त झाल्याने व थकल्याने ही तरुणी हॉलमध्येच झोपली़. काही मित्र मैत्रिणी दुसºया खोल्यात तर काही जण उशिरा निघून गेले होते़. या तरुणीला झोपलेली पाहून कॉग याने त्याचा गैरफायदा घेऊन पहाटेच्या सुमारास तिच्यावर बलात्कार केला़. त्यावेळी तिला जाग आली व आपल्यावर कॉगने अत्याचार केल्याचे लक्षात आल्यावर तिने तु माझ्यासोबत हे काय केले़, मला धोका का दिला, असे विचारल्यावर त्याने या तरुणीला याबाबत कोणाला सांगू नको अशी धमकी दिली़. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: friend raped on sleeping girl in the night party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.