शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या नावाने २ कोटींचा विमा काढला, नंतर त्याचाच 'गेम' केला; पैशांसाठी रचला भयंकर कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:11 IST

एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

तेलंगणाच्या भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बर्गमपाड पोलिसांनी मित्राच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली दोन तरुणांना अटक केली आहे. तब्बल दोन कोटी रुपयांची विमा रक्कम हडपण्यासाठी या दोघांनी हे भयानक कृत्य केल्याचा गंभीर आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक खासगी बँकेचा कर्मचारी आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीच्या रात्री बर्गमपाड मंडळातील मोथे गावाजवळ यशवंत हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं. त्याला तातडीने भद्राचलम येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खम्मम येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

यशवंतची मावशी मुलिसेट्टु रामा यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. हा केवळ अपघात नसून सुनियोजित हल्ला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. तपासादरम्यान गन्नावरम येथील कट्टा साई दीपक आणि त्याचा मित्र भद्राचलम येथील कोंडा भानु प्रकाश यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला.

मंगळवारी संध्याकाळी सरपाका येथे कारमधून जात असताना या दोघांना अटक करण्यात आली. यातील भानु प्रकाश हा एका खासगी बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. पोलीस तपासात उघड झालं की, नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपींनी यशवंतच्या नावाने एक विमा पॉलिसी काढली होती. यामध्ये साई दीपकला 'नॉमिनी' करण्यात आलं होतं. यासाठी साई दीपकने स्वतःला यशवंतचा नातेवाईक असल्याचं भासवलं होतं.

पोलिसांच्या आरोपानुसार, १४ फेब्रुवारीच्या रात्री दोन्ही आरोपींनी यशवंतला मोथे गावाजवळ नेलं. तिथे त्याला भरपूर दारू पाजली. यशवंत जेव्हा आपल्या स्कूटरवर बसण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा आरोपींनी मागून लोहेच्या रॉडने त्याच्या डोक्यावर वार केले. ही घटना अपघात वाटावी यासाठी आरोपींनी यशवंतची बाईक रस्त्याच्या कडेला फेकून दिली आणि त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून तिथून पळ काढला.

सब-इन्स्पेक्टर मेडा प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. यशवंतचा मृत्यू झाल्यास विम्याची मोठी रक्कम आपल्याला मिळेल या लालसेपोटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून पोलीस विमा कागदपत्रांची अधिक तपासणी करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Friend's Insurance Fraud: ₹2 Crore Plot, Murder Attempt Foiled

Web Summary : In Telangana, two men were arrested for plotting to kill their friend for a ₹2 crore insurance payout. They took out a policy in his name, named one as the nominee, and then attacked him, staging it as an accident. The police investigation revealed the conspiracy.
टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMONEYपैसाDeathमृत्यू