शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मित्रानेही चोरुन फोटो काढले अन् ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:26 IST

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देयाप्रकरणी तेजस दिलीप सोनवणे (२०) व चेतन पितांबर सोनार (२०) या दोघांविरुध्द बुधवारी रात्री शनी पेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकाने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्याचवेळी दुसऱ्याने धूर्तपणे दोघांचे मोबाईलमध्ये फोटो काढले व काही दिवसांनी हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तेजस दिलीप सोनवणे (२०) व चेतन पितांबर सोनार (२०) या दोघांविरुध्द बुधवारी रात्री शनी पेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गल्लीतील राहणाºया तेजस दिलीप सोनवणे याच्यावर प्रेम होते. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी मुलगी दहावीचा निकाल घेऊन घरी परत जात असतांना तेजस सोनवणे हा तिच्याजवळ आला. त्यावेळी तेजसचा मित्र चेतन पितांबर सोनार हा देखील होता. तेजसने मुलीला दुचाकीवर बसवून कोल्हे हिल्स टेकडीवर नेले, तेथे गप्पा मारल्या. त्यांच्या पाठोपाठ चेतनही दुचाकीने कोल्हे हिल्सवर पोहचला. पीडिता आणि तेजसच्या गप्पानंतर एका इमारतीच्या आडोश्याला तेजसने पीडितेवर बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. याचवेळी चेतने मोबाईलमध्ये चोरुन फोटो काढले. याप्रकारामुळे पीडिताने तेजसशी बोलणे बंद केले होते. दोघांचे बोलणे बंद झाल्याचा गैरफायदा घेत चेतन सोनार याने पिडीतेशी मैत्री वाढविली. वर्षभर चाललेल्या मैत्रीनंतर चेतनने पिडीतेला गोड बोलून फेब्रुवारी २०२० (नक्की तारीख माहिती नाही) मध्ये पुन्हा कोल्हे हिल्स येथे नेले. तेथे यापूर्वी तेजसने केलेल्या बलात्काराचे फोटो दाखविले. हे फोटो पाहून अल्पवयीन मुलीला धक्काच बसला. ‘मलाही शरीर संबंध प्रस्थापित करु दे, नाहीतर  हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, तुझ्या घरच्यांचे मोठे नुकसान करेल’ अशी धमकी दिली. यावेळी चेतननेही  बलात्कार केला. तोपर्यंत ही घटना मुलीने आई वडीलांना सांगितलेली नव्हती.संशयित राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा मुलगादरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांनी  मुलीच्या नावाने शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. फोटोची धमकी देवून पुन्हा दोघांसोबत संबंध ठेवण्याबाबत दबाव टाकत होते. हे सर्व असह्य झाल्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार पीडित मुलीने आईवडीलांना सांगितला. बुधवारी रात्री मुलीच्या फिर्यादीवरुन शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांच्याविरुध्द बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आरोपी तेजस सोनवणे हा शहरातील एका राजकीय पक्षाच्या  महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा आहेआरोपीच्या शोधार्थ पथके रवानागुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच दोघंही संशयित फरार

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसJalgaonजळगाव