शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाठग अजित पारसेकडून CBIचे बनावट लेटर, ५० कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न

By नरेश डोंगरे | Updated: November 8, 2022 20:16 IST

शेकडो जणांची फसवणूक, पण पोलीस म्हणतात- तक्रारदार आमच्याकडे येतच नाहीत!

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महाठग अजित पारसेच्या विरोधात कोट्यवधीच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल होऊन आता २८ दिवस झाले. मात्र, पोलिसांकडून त्याला अद्याप अटक झालेली नाही. तो अनफिट असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद आहे. अजितच्या कथित 'अनफिटनेस'ची दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलकडून चाैकशी का होत नाही, तेसुद्धा कळायला मार्ग नाही. दरम्यान, शंभरावर जणांना दोनशेवर कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घालणाऱ्या अजित पारसेचा आता चक्क ५० कोटींच्या फसवणूकीचा किस्सा चर्चेला आला आहे.

आपल्या ईमेज बिल्डिंग टीमच्या माध्यमातून सतत प्रकाशझोतात राहणारा महाठग पारसे याने विविध क्षेत्रातील मंडळींना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. हे करण्यासाठी त्याने थेट पंतप्रधान कार्यालयाच्या बनावट पत्राचाही वापर केला. हे करतानाच त्याच्या जाळ्यात आलेल्या अनेक लब्धप्रतिष्ठितांनाही त्याने सीबीआय, ईडीच्या कार्यालयाचा धाक दाखवून त्यांच्याकडून कारवाई टाळण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये घेतले.

अशाच प्रकारचा एक नवा किस्सा आता संबंधित वर्तुळात चर्चेला आला आहे. त्यानुसार, संशोधनाचे कार्य करणाऱ्या काही जणांवर महाठग पारसेने काही महिन्यांपूर्वी जाळे टाकले. सीबीआयकडून तुमची आणि संस्थेच्या कारभाराची चाैकशी तसेच संस्थेने मिळवलेल्या निधीचीही चाैकशी होणार असल्याची थाप मारली. ही थाप खरी वाटावी म्हणून त्याने फोटोशॉपच्या माध्यमातून तयार केलेेले सीबीआयचे एक बनावट लेटर संबंधितांना दाखवले. तुमचा किमान दीड-दोनशे कोटींचा घोळ लपविण्यासाठी चाैकशीच होऊ नये, असा प्रयत्न करावा लागेल, असेही सूचविले. त्याच्याकडून दाखविण्यात आलेल्या कथित लेटर बॉम्बमुळे पुरते थंडगार झालेल्या संबंधितांनी त्यालाच मार्ग काढण्याची विनंती केली.

स्वत:च दाखवली मांडवलीची तयारी- सावज जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्याने महाठग पारसेने दिल्लीच्या नावाखाली भलत्याच कुणाशी बोलून ५० कोटी द्यावे लागतील, असा प्रस्ताव ठेवला. ही रोकड देऊन चाैकशीचा आणि कारवाईचा ससेमिरा टाळता येईल. त्यासाठी आपण मांडवलीकार (मध्यस्थ) म्हणून भूमिका वठविण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले.

झाप झाप झापले अन्... - पारसेने मागितलेली रोकड फारच मोठी असल्याने प्रकरण एका शिर्षस्थांकडे गेले. त्यांनी पारसेला विचारणा केली नंतर दिल्लीत शहानिशा झाली आणि महाठग पारसेची बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे शिर्षस्थांकडून पारसेला झाप झाप झापण्यात आले, यापुढे दारात पाय ठेवायचा नाही आणि आमचे कुठे नाव वापरायचे नाही, अशी तंबीही शिर्षस्थांनी महाठग पारसेला दिली होती, अशी चर्चा आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद?- छोट्या-मोठ्या फसणूकीच्या प्रकरणात अत्यंत आक्रमकपणे कारवाई करणारे शहर पोलीस महाठग पारसेविरुद्ध ठोस कारवाई का करत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने पोलिसांची भूमीकाच संशयास्पद ठरली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारले असता 'पारसे अनफिट आहे, त्यामुळे त्याला अटक करता येणार नसल्याचे अधिकारी म्हणतात. 'पारसेच्या अनफिटनेसची शहानिशा का होत नाही, त्यावर मात्र ठोस उत्तर मिळत नाही.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग