शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लष्करात सुभेदार मेजर आहे म्हणत तब्बल ५ जणींशी लग्न केले; वीरपत्नींना पेन्शनसाठी फसविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 17:17 IST

belgoan, crimenews, karnataka, police, kolhapur news बेळगावात लखोबा लोखंडेचा अवतार उघडकीस आला आहे.  तब्बल ५ जणींशी केले लग्न  करणाऱ्या एका भामट्याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.  लष्करी अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणाऱ्या या भामट्याने तब्बल ५ जणींशी लग्न केले असून पेन्शन मिळवून देण्याचे आमिष दाखविले आहे. त्याचप्रमाणे शहिद जवानांच्या पत्नीचीही याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या तोतया लष्करी अधिकाऱ्याला कॅम्प पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देलष्करी अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूकतोतया लष्करी अधिकाऱ्याला बेड्या

बेळगाव- बेळगावात लखोबा लोखंडेचा अवतार उघडकीस आला आहे.  तब्बल ५ जणींशी केले लग्न  करणाऱ्या एका भामट्याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.  लष्करी अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणाऱ्या या भामट्याने तब्बल ५ जणींशी लग्न केले असून पेन्शन मिळवून देण्याचे आमिष दाखविले आहे. त्याचप्रमाणे शहिद जवानांच्या पत्नीचीही याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या तोतया लष्करी अधिकाऱ्याला कॅम्प पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.लष्करी गणवेश परिधान करून कॅम्प परिसरात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या या भामट्याला पकडून लष्कराने कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याचे बिंग बाहेर पडले. तोतया लष्करी अधिकाऱ्याचे नाव मंजुनाथ बिरादार असे असून तो विजापूर जिल्ह्यातील नालवतवाड गावातील आहे.

लष्करात सुभेदार मेजरपदी असल्याची बतावणी करून त्याने तब्ब्ल पाच जणींशी लग्न केले आहे. यासोबतच दहापेक्षा अधिक शहिद जवानांच्या पत्नींना वन रँक पेन्शन देण्याचे सांगून पैसे उकळले आहेत. अनेक तरुणांना लष्करात नोकरी लावतो म्हणून हजारो रुपये आपण घेतल्याचे त्याने पोलीस चौकशीदरम्यान कबुल केले आहे.या भामट्याने अनेक ठिकाणी असे उपद्व्याप केले असून एखाद्या गावात जाऊन लष्करी गणवेशात रुबाब मारून अनेक गावातील मान्यवर मंडळींची भेट घेऊन आपण अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्यावर छाप पाडली. तर कधी मी अनाथ आहे असे सांगून मला लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगायचे. अशापद्धतीने सहानुभूती मिळवून त्याच गावातील मुलीशी लग्न करून महिनाभर सासुरवाडीत पाहुणचार घ्यायचा आणि अचानक गायब व्हायचा. तर गावातील शहिद कुटुंबाचा जाहीर सत्कार करून त्यांच्याशी ओळख वाढवून वन रँक पेन्शन मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे.

अशापद्धतीने त्याने जवळपास दहा शहीद जवानांच्या पत्नींकडून पैसे उकळले आहेत. अनेक तरुणांना सैन्यात नोकरी मिळवून देण्याचे सांगून पैसे उकळले आहेत. सध्या कॅम्प पोलीस या तोतया लष्करी अधिकाऱ्याची कसून चौकशी करत असून हे प्रकरण त्याच्या गणवेशावरून बाहेर आल्याचे समजते आहे. गणवेश घालून कॅम्प भागात फिरताना हि बाब लक्षात आली आणि त्यानंतर कॅम्प पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस