सुटे पैसे देण्याच्या नावाने सात लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 03:27 IST2020-10-27T03:26:35+5:302020-10-27T03:27:12+5:30
Crime News : जादा कमिशन देण्याच्या आमिषाने १० ते ५०० रुपयांचे सुटे पैसे देण्याच्या नावाखाली सात लाखांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा कापूरबावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

सुटे पैसे देण्याच्या नावाने सात लाखांची फसवणूक
- जितेंद्र कालेकर
ठाणे : दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यामध्ये जादा कमिशन देण्याच्या आमिषाने १० ते ५०० रुपयांचे सुटे पैसे देण्याच्या नावाखाली सात लाखांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा कापूरबावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील संजय मोहोड (४०, रा. मुंब्रा, ठाणे) याला अटक केली असून त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील ठाण्यातील बाळकुमनाका, माजिवडा येथे मोहन आणि शर्मा असे नाव सांगणाऱ्या दुकलीने भारतीय चलनातील १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपये नोटांच्या बदल्यामध्ये कमिशन देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी राकेश उपाध्याय याच्याशी सात लाखांचा व्यवहार केला. मात्र, हा व्यवहार खोटा ठरवून पैशांची देवाणघेवाण करताना पोलिसांनी पकडल्याचा बनाव रचून शर्मा आणि त्याच्या पाच साथीदारांनी मिळून उपाध्याय यांच्याकडील सात लाखांची रोकड असलेली बॅग आणि मोबाइल घेऊन ४ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पोबारा केला होता.