प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता चित्रपट निर्मात्यांना घातला तब्बल ५८ कोटींना गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 03:23 PM2021-01-09T15:23:40+5:302021-01-09T15:27:11+5:30

पुण्यात बाणेर व कोरेगाव पार्क येथे प्लेबॉय बिअर गार्डन आऊटलेट हे दुकान तसेच भारतभर दुकाने सुरु केली.

Fraud of Rs 58 cror ewith filmmakers without paying royalties for Playboy unit franchise | प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता चित्रपट निर्मात्यांना घातला तब्बल ५८ कोटींना गंडा 

प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता चित्रपट निर्मात्यांना घातला तब्बल ५८ कोटींना गंडा 

Next

पुणे : प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता हिंदी चित्रपट निर्मात्याची तब्बल ५८ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन जगदीशप्रसाद जोशी (रा. हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई) इतर संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी चित्रपट निर्माते पराग मधू संघवी (वय ४८, रा. अंधेरी) यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१६ ते जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग संघवी हे हिंदी चित्रपट निर्माते आहेत. प्लेबॉय या अमेरिकन कंपनीचे भारतातील सर्वाधिकार संघवी यांच्याकडे होते. जून २०१६ मध्ये संघवी यांच्या कंपनीत सचिन जोशी यांनी गुंतवणुक केली. त्यांच्याबरोबर भारतभर असणार्या प्ले बॉय युनिट येथे सचिन जोशी यांच्यासह वायकिंग मीडिया ॲन्ड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे अन्य संचालक यांनी संघवी यांच्याशी सामंजस्य करार केला.

पुण्यात बाणेर व कोरेगाव पार्क येथे प्लेबॉय बिअर गार्डन आऊटलेट हे दुकान तसेच भारतभर दुकाने सुरु केली. संघवी यांच्याबरोबर केलेल्या करारानुसार त्यांना फ्रँचायजीने कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर केला. मात्र, आरोपींनी २०१६ पासून त्यांना देणे असलेली रॉयल्टी दिली नाही. खोटी कागदपत्रे बनवून संघवी यांच्या कंपनीची ५८ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे अधिक तपास करीत आहेत.
संघवी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला असल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

Web Title: Fraud of Rs 58 cror ewith filmmakers without paying royalties for Playboy unit franchise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.