बँकेच्या पेन्शन खात्यातून एक लाख २० हजार काढून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:19 IST2019-09-18T16:17:56+5:302019-09-18T16:19:21+5:30
बँकेतील पेन्शन खात्यातून अज्ञात आरोपीने एक लाख २० हजार रुपये ट्रान्सफर करून व काही रक्कम एटीएममधून काढून देशमुख यांची फसवणूक केली.

बँकेच्या पेन्शन खात्यातून एक लाख २० हजार काढून फसवणूक
पिंपरी : बँकेतील पेन्शन खात्यातून एक लाख २० हजार रुपये ट्रान्सफर करून व एटीएममधून काही रक्कम काढून घेतली. जेष्ठ नागरिकाची फसवणूक केली. चिखली येथे मंगळवारी (दि. १७) हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अनिल विष्णूपंत देशमुख (वय ६७, रा. प्राधिकरण, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी देशमुख यांच्या बँकेतील पेन्शन खात्यातून अज्ञात आरोपीने एक लाख २० हजार रुपये ट्रान्सफर करून व काही रक्कम एटीएममधून काढून देशमुख यांची फसवणूक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.