बोगस कॉल सेंटरमधून विदेशी नागरीकांची फसवणूक, ६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:32 IST2022-02-02T14:31:53+5:302022-02-02T14:32:29+5:30
आरोपी कॉलसेंटर चालवून अमेरीका देशातील नागरीकांना ते वापरत असलेल्या अमेझॉन, पेपल या ॲप बाबत ब्लास्टींग मॅसेज पाठवून त्यांनी या अॅपवरून 399 डॉलर्सचा व्यवहार झाल्याचे दाखवायचे

बोगस कॉल सेंटरमधून विदेशी नागरीकांची फसवणूक, ६ जणांना अटक
ठाणे - ठाण्याच्या कापूरबावडीतील लेक सिटी हे बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या 6 जणांना गुन्हे शाखेच्या घटक 1 ने बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे बोगस कॉल सेंटर चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकली. आरोपीकडून पोलिसांनी संगणकातील हार्ड डॉस्क, रजिस्टर्स, राउटर्स, फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारे स्क्रिप्ट, मोबाईल फोन, असा सुमारे 1 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी कॉलसेंटर चालवून अमेरीका देशातील नागरीकांना ते वापरत असलेल्या अमेझॉन, पेपल या ॲप बाबत ब्लास्टींग मॅसेज पाठवून त्यांनी या अॅपवरून 399 डॉलर्सचा व्यवहार झाल्याचे दाखवायचे. त्यांना बोगस कॉल सेंटरचा नंबर पाठवून संपर्क साधण्याबाबत कळवायचे. त्यानुसार अमेरीका देशातील संबंधीत नागरीकांनी त्यांना मिळालेल्या संदेशानुसार व्यवहार केला नसल्यास तो व्यवहार रद्द करण्यासाठी आरोपी चालवीत असलेल्या कॉलसेंटरशी सपर्क साधायचे. तेव्हा या कॉलसेंटर मधील टेलीकॉलर्स हे आयबीम सॉफ्टवेअरचा वापर करून ठरवीलेल्या स्किप्टनुसार कॉल करणाच्या संबंधीत नागरिकाला एनी डेस्क, अल्ट्रा व्हीवर, सुप्रोमो, अॅपल मीक्स हे ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्यामाफर्त आर्थिक फसवणूक करत होते. त्यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत पुढील तपास खंडणीविरोधी पथकाकडून सुरू आहे.