पुणे : बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सुत्रधार लान्स नाईक शेख अलीम समद गुलाबा हा आपण हैदराबाद येथील निजामाचे वंशज असल्याचे सांगत व त्यांची मोठ्या प्रमाणावर रोकड आपल्याकडे असल्याचा हवाला देऊन ट्रस्टी, देणगीदार,एजंट यांना करोडोचा गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी त्याने भाडेतत्वावर घेतलेल्या बंगल्यात काही प्रतिमाही लावल्या होत्या. त्यावरुन अनेक जण त्याच्या जाळ्यात अडकले आहेत. लान्स नाईक अलीम याच्यासह सुनिल सारडा (वय ४०), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय ४३), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय १९), रितेश रत्नाकर (वय३४) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय २८) या सर्वांच्या पोलीस कोठडीत २०जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ८७ कोटी रुपयांच्या बनावट तसेच खऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात, अलीम खान हा चिल्ड्रन्स बँकेचे नोटांचे वर खऱ्या नोटा लावून त्याची थप्पी त्याच्या भाड्याने घेतलेल्या बंगल्याच्या खोलीत ठेऊन त्याच्यावर आजचे वर्तमानपत्र ठेवून त्याचे व्हिडिओ बनवत होता. ते व्हिडिओ तो त्याच्या एजंट यांना पाठवत होता. ते एजंट पुढे ट्रस्ट अधिकारी, देणगीदार कंपन्या व इतर मध्यस्थांना देऊन त्यांच्याकडे रोख रक्कम असल्याची खात्री पटवत होते. त्याद्वारे त्यांना कमिशन मिळत होते.अलीम खान याने मागील ६ महिन्यात अशा प्रकारे २५ ते ३० व्हिडिओ बनवून त्याद्वारे कमिशन पोटी आर्थिक फायदा करून घेतला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ट्रस्टी, देणगीदार, एजंटांना करोडोंचा गंडा; पुण्यातील ८७ कोटींच्या बनावट नोटा प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 21:15 IST
आरोपी लान्स नायक आपण हैदराबाद येथील निजामाचे वंशज असल्याचे सांगत व त्यांची मोठ्या प्रमाणावर रोकड आपल्याकडे असल्याचा द्यायचा हवाला..
ट्रस्टी, देणगीदार, एजंटांना करोडोंचा गंडा; पुण्यातील ८७ कोटींच्या बनावट नोटा प्रकरण
ठळक मुद्देजमीन, मालमत्ता, गाड्यांमध्ये गुंतवणूकआरोपींच्या पोलीस कोठडीत २०जूनपर्यंत वाढ