ब्रिटीश हाय कमिशनचा अधिकारी असल्याचे भासवून एकाची २९ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 16:19 IST2019-03-08T16:13:38+5:302019-03-08T16:19:19+5:30
एका महिलेने तिचा एक सहकारी ब्रिटीश हाय कमिशनचा अधिकारी असल्याचे भासवून वेगवेगळया बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून एकाची २९ लाखांची फसवणूक केली..

ब्रिटीश हाय कमिशनचा अधिकारी असल्याचे भासवून एकाची २९ लाखांची फसवणूक
पिंपरी : सोशल मिडियावरुन ओळख झालेल्या एका महिलेने तिचा एक सहकारी ब्रिटीश हाय कमिशनचा अधिकारी असल्याचे भासवून वेगवेगळया बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून एकाची २९ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी ११ जणांवर निगडी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुसन जॉन्सन, जॉन हिल्स, रिना भाटिया, न्नने बाबु, विजय वर्मा, फिरासत, मिझाजुल खान, गौतम पॉल, सुजाता पॉल, सुभजित मजुमदार, संजय गुप्ता अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नतेसन जयरामन (वय ५७, रा. रुणल फ्लोरन्स फेज-२, सेक्टर क्रमांक २१, यमुनानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयरामन यांची सोशलमिडियावरुन सुसन जॉन्सन या नावाच्या ब्रिटीश महिलेशी ओळख झाली. या महिलेने जॉन हिल्स हा ब्रिटीश हाय कमिनशनचा अधिकारी असल्याचे सांगून जयरामन यांचा विश्वास संपादन केला. तसेच आरोपींनी जयरामन यांना वेळावेळी वेगवेगळी कारणे सांगून ऑनलाईन पैशांची मागणी केली. वेगवेगळया बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून जयरामन यांची २९ लाख ४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.