पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 09:49 PM2021-06-24T21:49:21+5:302021-06-24T21:52:03+5:30

Mumbai Corona Vaccine : पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ज्या २०७ जणांना लस टोचण्यात आली त्यात सरकारी बँक तसेच खासगी अस्थापनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Fraud of 207 people in Poddar Educational Institute; Fifth FIR filed in bogus vaccination case | पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल

पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल

Next

मुंबई: बोगस लसीकरणप्रकरणी पाचवी एफआयआर गुरुवारी बांगुरनगर पोलिसांनी दाखल केली. पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये हे लसीकरण करण्यात आले. ज्यात २०७ लोकांचा समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ज्या २०७ जणांना लस टोचण्यात आली त्यात सरकारी बँक तसेच खासगी अस्थापनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बोरिवलीच्याआदित्य कॉलेजमधील २१३ जणांच्या बोगस लसीकरण प्रकरणी बुधवारी बोरिवली पोलिसांनी चौथा दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. ज्यात कोकिलाबेहेन रुग्णालयाचा माजी कर्मचारी राजेश पांडे, शिबिर आयोजक संजय गुप्ता आणि मास्टरमाइंड महेंद्र सिंग याच्यासह अजुन पाच जणांची नावे आहेत. या टोळक्याने अद्याप ९ ठिकाणी असे बनावट लसीकरण शिबिर आयोजित केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यात आदित्य कॉलेजसह चित्रपट प्रोडक्शन हाऊस, हिरानंदानी हेरिटेज सोसायटी यांचा समावेश आहे.

English summary :
Fraud of 207 people in Poddar Educational Institute; Fifth FIR filed in bogus vaccination case

Web Title: Fraud of 207 people in Poddar Educational Institute; Fifth FIR filed in bogus vaccination case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app