पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 21:52 IST2021-06-24T21:49:21+5:302021-06-24T21:52:03+5:30
Mumbai Corona Vaccine : पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ज्या २०७ जणांना लस टोचण्यात आली त्यात सरकारी बँक तसेच खासगी अस्थापनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल
मुंबई: बोगस लसीकरणप्रकरणी पाचवी एफआयआर गुरुवारी बांगुरनगर पोलिसांनी दाखल केली. पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये हे लसीकरण करण्यात आले. ज्यात २०७ लोकांचा समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ज्या २०७ जणांना लस टोचण्यात आली त्यात सरकारी बँक तसेच खासगी अस्थापनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बोरिवलीच्याआदित्य कॉलेजमधील २१३ जणांच्या बोगस लसीकरण प्रकरणी बुधवारी बोरिवली पोलिसांनी चौथा दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. ज्यात कोकिलाबेहेन रुग्णालयाचा माजी कर्मचारी राजेश पांडे, शिबिर आयोजक संजय गुप्ता आणि मास्टरमाइंड महेंद्र सिंग याच्यासह अजुन पाच जणांची नावे आहेत. या टोळक्याने अद्याप ९ ठिकाणी असे बनावट लसीकरण शिबिर आयोजित केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यात आदित्य कॉलेजसह चित्रपट प्रोडक्शन हाऊस, हिरानंदानी हेरिटेज सोसायटी यांचा समावेश आहे.