चारचाकी वाहनाला धक्का लागल्याने बसचालकासह वाहकाला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 18:16 IST2021-11-14T18:15:12+5:302021-11-14T18:16:36+5:30
Assaulting Case :

चारचाकी वाहनाला धक्का लागल्याने बसचालकासह वाहकाला बेदम मारहाण
नाशिक : चारचाकी वाहनाला धक्का लागल्याची कुरापत काढून सिटीलिंक बसचालक आणि वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना म्हसरूळ बोरगड परिसरात शनिवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.
मनपा प्रशासनाने सुरू केलेल्या सिटीलिंक बसवर चालक म्हणून काम करणाऱ्या चालक आणि वाहकाला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर म्हसरूळ पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांर कारवाई करण्यापेक्षा तक्रार देणाऱ्यांना धमकावल्याचा प्रकार घडला असल्याचे समजते. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्यात एका महिलेचा सहभाग असून सदर प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिटीलिंक बसवर चालक म्हणून काम करणारे चालक गोकुळ काकड व वाहक अक्षय गवारे म्हसरूळ बोरगड परिसरात वाहन फेरी घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनातील संशयितांनी चारचाकी वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून कुरापत काढून बस रस्त्यावर थांबवून बसमध्ये चढून बेदम मारहाण केली मारहाण करणाऱ्या संशयितामध्ये एका महिलेचा सहभाग असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.