नगरपंचायत कर्मचारी आत्महत्या प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 19:15 IST2021-09-12T19:14:39+5:302021-09-12T19:15:59+5:30
Crime News : कारंजा येथील नगरपंचायत मधील लिपिक अशोक जसुतकर यांनी नगरपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती.

नगरपंचायत कर्मचारी आत्महत्या प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल
वर्धा :- कारंजा ( घा.) येथील नगरपंचायतमध्ये शनिवारी गळफास घेऊन लिपिकानी आत्महत्या केल्याप्रकरणी रविवारी नगरपंचायतच्या चार कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध मृतकाची पत्नी सुनंदा जसुतकर यांच्या तक्रारीवरून कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारंजा येथील नगरपंचायत मधील लिपिक अशोक जसुतकर यांनी नगरपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. जसुतकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत त्यांच्याच कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांचे नाव लिहली होती नगरपंचायतच्या करवसुलीसाठी त्यांना चारही आरोपी त्रास देत असल्याचे नावे लिहले आहे. यामध्ये राजेंद्र घाडगे, देवीदास पूंडलीक मानकर, तूषार साबळे, रामचंद्र नरवळे यांचे नाव नमूद केले असून यांच्याविरुद्ध कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत करीत आहे.