Four people were beaten by an iron rod for minor reasons | किरकोळ कारणावरून चार जणांना लोखंडी रॉडने मारहाण
किरकोळ कारणावरून चार जणांना लोखंडी रॉडने मारहाण

पिंपरी :  हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून चार तरुणांना चौघांनी लोखंडी रॉड व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १७) रात्री रहाटणी फाटा येथे घडली.
  याप्रकरणी हुसेन नबीसाब शेख (वय २६, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष वसंत खलसे, प्रतीक पवार, विशाल बाबर (सर्व रा. थेरगाव) आणि त्यांचा एक मित्र (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हुसेन आणि त्यांचे मित्र किरण शेळके, विनोद भवार, जितेंद्र देवरे हे एका हॉटेलमध्ये जेवण करून पायी चालले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी तू काऊंटरवर आमच्या मित्राला धक्का का मारला, अशी विचारणा करीत फिर्यादी व त्यांच्या चार मित्रांना लोखंडी रॉड आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. या घटनेत हुसेन हे गंभीर जखमी झाले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Four people were beaten by an iron rod for minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.