दरोड्याच्या तयारी असलेल्या मुंबईच्या चार जणांना भुसावळात अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 16:00 IST2018-10-01T16:00:11+5:302018-10-01T16:00:35+5:30

त्यांच्याकडून चॉपर, लोखंडी कोयता, लोखंडी सुरी, दोन मोबाईल, साडेसात हजार रुपये रोख, मिरचीची थैली व चारचाकी वाहन असे एक लाख दहा हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

Four of Mumbai's preparations for the dacoity were arrested in Bhusaval | दरोड्याच्या तयारी असलेल्या मुंबईच्या चार जणांना भुसावळात अटक 

दरोड्याच्या तयारी असलेल्या मुंबईच्या चार जणांना भुसावळात अटक 

जळगाव - दरोड्याच्या तयारी असलेल्या मुंबईतील चार जणांना पोलिसांनी अटक केल्याची घटना आज पहाटे तीन वाजता भुसावळात घडली. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. मोहीददीन शेख निजामुद्दीन शेख (वय ४०) राहणार काझी वाडा पाईप लाईन, साकी नाका, अंधेरी, शाकीर हैदर शेख (वय ४०) हा  मुंब्रादेवी रोड येथे राहणार असून आरोपी अफलोज इस्लाम शेख (वय २३) हा नालासपोरा धानु बाग येथे राहणार आहे आणि  हुसेन मोहंम्मद रफीक शेख (वय २८) हा रमाबाई चाळ रु.नं.६५, अंधेरी येथे राहणार असून या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  

त्यांच्याकडून चॉपर, लोखंडी कोयता, लोखंडी सुरी, दोन मोबाईल, साडेसात हजार रुपये रोख, मिरचीची थैली व चारचाकी वाहन असे एक लाख दहा हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.  यापैकी शाकीर शेख व अफलोज  शेख याच्याविरुद्ध चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.  तपास पोलीस उपनिरीक्षक निशिकांत जोशी करीत आहे

Web Title: Four of Mumbai's preparations for the dacoity were arrested in Bhusaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.