निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणीत चार लाख जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 21:58 IST2019-09-25T21:54:03+5:302019-09-25T21:58:53+5:30
निवडणूक विभाग व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणीत चार लाख जप्त
वणी (यवतमाळ) : निवडणूक विभाग व पोलिसांनी लालगुडा येथे एका वाहनातून रोख चार लाख रुपये जप्त केले. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास एक वाहन (एम.एच.३४/बी.एफ.८१३१) राजुराकडून वणी येथे येत होते. लालगुडाजवळ या वाहनाची नाकाबंदीदरम्यान तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनात रोख चार लाख रुपये आढळले. चालक शरफुद्दीन याला याबाबत विचारणा करण्यात आली. नंतर ही रक्कम जप्त केली. निवडणूक विभाग व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, यापूर्वीच यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील घाटोडी येथे १८ लाख ५९ हजार तर वणी तालुक्यातील बेलोरा येथे २५ लाख अशी ४३ लाख ५९ हजारांची रोकड पोलीस व निवडणूक विभागाने जप्त केली आहे.