शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Jalgaon News : जळगाव हादरलं! रखवालदाराच्या चार मुलांची कुऱ्हाडीनं घाव घालून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 11:40 AM

Jalgaon Raver Murder News: रखवालदार पती पत्नी गावी गेले असताना घडला प्रकार

रावेर (जि. जळगाव): एका शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुर्‍हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बोरखेडा (ता.रावेर) रोडवर आज सकाळी ८ वाजता  उघडकीस आली. या हत्याकांडाने रावेर हादरले आहे. सविता मेहताब भिलाला (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व राणी (वय ५) अशी हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत. शेतातील रखवालदार पती पत्नी गावाला गेले असताना ही घटना घडली. रावेर शहरापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या बोरखेडा रोडवरील मुस्तफा यांच्या केळीबागेच्या शेतातील रखवालदार महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व मोठ्या मुलासह मुळगावी गढी (ता. बिस्टान जि. खरगोन) येथील चुलतभावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी गेला होता. गुरुवारी रात्री घरात गाढ झोपलेल्या सविता,  राहुल, अनिल व राणी या चारही मुलांची अज्ञात मारेकऱ्यांनी कुर्‍हाडीने घाव घालून हत्या केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.