माता न तू वैरिणी; पोटच्या गोळ्याला विकले साडेचार लाखांना, ११ जणांना अटक पोलिसांनी केली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 11:21 IST2023-03-25T11:21:10+5:302023-03-25T11:21:29+5:30

अर्भकाच्या मातेकडून १ लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. 

Four and a half lakhs were sold for baby, 11 people were arrested by the police | माता न तू वैरिणी; पोटच्या गोळ्याला विकले साडेचार लाखांना, ११ जणांना अटक पोलिसांनी केली 

माता न तू वैरिणी; पोटच्या गोळ्याला विकले साडेचार लाखांना, ११ जणांना अटक पोलिसांनी केली 

चतरा : झारखंडमधील चतरा जिल्ह्यात एक माता आपल्या पोटच्या गोळ्याची वैरीण बनली. तिने आपल्या नवजात अर्भकाला एका व्यक्तीस साडेचार लाख रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मातेसह ११ जणांना अटक केली. 
नवजात अर्भकाला विकल्याची माहिती चतरा जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त अबू इम्रान यांना मिळाली. त्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात झाली. मातेने विकलेल्या अर्भकाची पोलिसांनी बोकारो जिल्ह्यातील काही व्यक्तींच्या तावडीतून सुटका केली आहे. अर्भकाच्या मातेकडून १ लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. 

चतरा जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या पोटच्या गोळ्याला विकण्यासाठी दोन दलालांशी बोलणी केली. या नवजात अर्भकाला साडेचार लाख रुपयांना विकण्याचा त्यांच्यामध्ये व्यवहार ठरला. या अर्भकाचे आई-वडील हे हजारीबाग जिल्ह्यातील बडकागाव येथील रहिवासी आहेत. त्याच्या मातेला साडेचार लाखांपैकी १ लाख रुपये देण्यात आले व बाकीचे साडेतीन लाख रुपये दोन दलालांनी वाटून घेतले. 
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ११ जणांना अटक केली. पोटच्या गोळ्याला विकणारी माता व तिला साथ देणाऱ्या लोकांवर कडक शिक्षा करा अशी या परिसरातील लोकांनी मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Four and a half lakhs were sold for baby, 11 people were arrested by the police