शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

दीपिका पदुकोणसह चार अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 06:22 IST

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी होणार : दीपिकाची मॅनेजर, निर्माता मधू मांटेनासह तिघांना समन्स

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) रडारवर आता आघाडीचे सेलिब्रिटी आले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश, चित्रपट निर्माता मधू मांटेना आणि ‘क्वान’ टॅलेंट व्यवस्थापन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चिटगोपेकर यांना मंगळवारी समन्स बजाविण्यात आले. येत्या आठवडाभरात त्यांच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार असल्याचे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि अन्य ड्रग तस्करांकडे सुरू असलेल्या चौकशीतून ही नावे समोर आली आहेत. याबाबत अभिनेत्री दीपिकासह सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचीही नावे समोर आली असून त्यांनाही चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुशांतला ड्रग्ज पुरविल्याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या अटकेनंतर एनसीबीने अनेकांना अटक केली आहे. तिच्यासोबत ड्रगसंबंधी चॅट करणाºया जया साहा हिच्याकडे दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. मंगळवारी तिच्याकडे सुमारे सहा तास विचारणा करण्यात आली. बुधवारीही तिच्याकडे चौकशी केली जाणार असून ‘ड्रग्ज कनेक्शन’ स्पष्ट झाल्याने तिला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. तिच्याकडे व ड्रग तस्कर अनुज आणि सॅमकडे केलेल्या चौकशीतून ‘क्वीन’ चित्रपटाचा निर्माता मधू मांटेनाचे नाव समोर आले आहे. बॉलीवूडला ड्रग्ज पुरवणाºयांशी त्याचे जवळचे संबंध असल्याची माहिती मिळाल्याने त्याला समन्स बजाविले आहे.दिया मिर्झाने केला इन्कार : ड्रग्ज कनेक्शनमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा हिचाही सहभाग असल्याची चर्चा विविध वृत्तवाहिन्यांवरून करण्यात येत आहे. मात्र तिने टिष्ट्वटरवरून त्याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे.डी, एस, एन, के कोण?जयाकडील मोबाइल चॅटवर ड्रग्जशी संबंधित डी, एस, एन, के ही अभिनेत्रींच्या नावांची आद्याक्षरे मिळाली आहेत. दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचा २0१७ मधील संभाषणाचा एक चॅट समोर आला आहे. त्यात ती करिष्माला पार्टीच्या ठिकाणी ड्रग्ज घेऊन यायला सांगते. ‘क्वान’ टॅलेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चिटगोपेकर यांनी आयोजित केलेल्या पार्टीत बोलावले होते. त्यामुळे त्या दोघांनाही चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्यानंतर अन्य अभिनेत्रींकडेही चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणDia Mirzaदीया मिर्झाDrugsअमली पदार्थ