महिलेचे धड सापडल्यानंतर आता पाय सापडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 16:39 IST2020-01-01T16:38:31+5:302020-01-01T16:39:38+5:30
या प्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.

महिलेचे धड सापडल्यानंतर आता पाय सापडले...
मुंबई - घाटकोपरमध्ये महिलेचे धड सापडल्यानंतर, मंगळवारी कुर्ला परिसरात महिलेचे दोन पाय सापडले आहेत. तिच्या शिराचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.
विद्याविहार एसटी डेपोजवळील किरोळ रोडच्या पदपथावर सोमवारी एका चादरीत ३० ते ३५ वयोगटांतील महिलेचा धड आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी धड ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला. या महिलेचे दोन्ही पाय आणि शिर शरीरापासून वेगळे करण्यात आले होते. मयत महिलेची ओळख पटू नये, यासाठी हत्या करणाऱ्याने महिलेचे शिर अन्य ठिकाणी टाकले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने, दोन ते तीन दिवसांपूर्वी या महिलेची हत्या झाली असावी. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.