Found rhea and sushant's drug supplier, another big fish caught by NCB's net | सापडला रिया, सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा, एनसीबीच्या जाळ्यात अडकला आणखी एक मोठा मासा

सापडला रिया, सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा, एनसीबीच्या जाळ्यात अडकला आणखी एक मोठा मासा

ठळक मुद्दे ड्रग्ज कनेक्शनमध्ये एक मोठा मासा एनसीबीच्या गळाला लागला आहे. करमजीत असं या आरोपीचं नाव आहे. 

मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जचं जाळं पुढे आल्यानंतर सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाअटक करण्यात आली. त्यानंतर रियाच्या तपासात या प्रकरणात अनेक महत्त्वाचे धागेदोरे NCBच्या हाती लागले आहेत. आज आणखी एक मोठी कारवाई  करण्यात आली आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये एक मोठा मासा एनसीबीच्या गळाला लागला आहे. करमजीत असं या आरोपीचं नाव आहे. 

एनसीबीने छापेमारीदरम्यान धडक कारवाई करताना करमजीत नावाच्या व्यक्तीला अटक केली. ड्रग्ज जगतात तो 'केजे' या नावाने प्रसिद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. करमजीत हा कॅपरी आणि लिटिल हाइट्स हे ड्रग्ज सप्लाय करायचा अशी समोर आली आहे. सुशांत-रिया ड्रग्ज कनेक्शनमध्ये करमजीत हा महत्त्वाचा पुरावा आहेत. करमजीत हा सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला ड्रग्ज सप्लाय करायचा. नंतर त्यांच्यामार्फत ड्रग्ज रिया आणि सुशांतपर्यंत पाहचत असल्याचं एनसीबीच्या तपासात पुढे आलं आहे. करमजीतची एनसीबीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. रियाचा भाऊ शोविकशी त्याचा थेट संपर्क असल्याचं स्पष्ट झाल्याने त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघड होण्याची दाट शक्यता आहे. रियाने दिलेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या कारवाईला वेग आलेला आहे. ड्रग्ज डीलर अनुज केशवानी, गौरव आर्या यांनीही महत्त्वाची महिती दिली असून गोवा आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून चौकशी करण्यात येत आहे. करमजीत ही एनसीबीच्या कारवाईत अकरावी अटक आहे. 

 

रिया चक्रवर्तीच्या ड्रग्स स्टोरीमध्ये सारा अली खानोबतबॉलिवूडमधील ४ मोठी नावे समोर आली आहेत. यांची नावे ड्रग्स कनेक्शनमध्ये जुळले आहेत. रियाने या तीन लोकांची नावे NCB ला सांगितली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB या पाच लोकांवर लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. साराला समन्स बजावून पुढील आठवड्यात कार्यालयात बोलावून चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे अनुज केशवानीनेही साराचं नाव घेतलं आहे. साराला गांजा पुरवल्याचे अनुजने तपासात सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सारा व बॉलिवूडमधील आणखीही काही जण अनुजच्या संपर्कात होते, असे स्पष्ट होत आहे. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम  

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

 

Web Title: Found rhea and sushant's drug supplier, another big fish caught by NCB's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.