शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्यासह त्यांच्या पुत्राची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 21:18 IST

Murder Case : व्यावसायिकाला बेड्या, गडगंज संपत्ती लाटण्यासाठी पित्यासह पुत्राचाही काढला काटा; जिल्ह्याबाहेर मृतदेह पेटविले

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) यांच्यासह त्यांचा पुत्र अमित कापडणीस (३५, दोघे रा. आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित कॉलनी) यांचा गेल्या डिसेंबर महिन्यात दोन टप्प्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघडकीस आली. पोलिसांनी कापडणीस पिता-पुत्रांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्य संशयित व्यावसायिक आरोपी राहुल गौतम जगताप (३६, रा. आनंद गोपाळ पार्क) यास बुधवारी (दि.१६) पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने पिता-पुत्रांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेऊन जात पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

शरणपूर रोडवरील जुन्या पंडित कॉलनीमध्ये राहणारे कापडणीस पिता-पुत्र हे मागील काही वर्षांपासून एकटेच राहत होते. पत्नी व मुलगी नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. अमित कापडणीस याने एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले असून, तो कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सराव करत नव्हता. दोघेही पिता-पुत्र एकाकी जीवन जगत होते. त्यांच्याच आनंद गोपाळ पार्क नावाच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राहुल याने त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवून अमितसोबत मैत्री केली. मैत्रीतून त्याने त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेविषयी तसेच बँक, शेअर मार्केट, डिमेट खात्यातील गुंतवणूकविषयीची माहिती जाणून घेतली. गडगंज संपत्ती असल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल याने थंड डोक्याने कापडणीस पिता-पुत्रांच्या हत्येचा कट रचल्याने पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.१६) सांगितले.

दरम्यान, कापडणीस यांच्या पत्नी, मुलगी हे मुंबईत वास्तव्यास असून, मागील काही महिन्यांपासून नाशिकस्थित पिता-पुत्रांच्या त्या संपर्कात नव्हत्या. दरम्यान, भाऊ अमितचा फोन लागत नाही व वडिलांचा फोन दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीकडे असून, त्याने फोन घेत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कापडणीस यांची कन्या शीतल यांनी नाशिक गाठले. यावेळी त्यांनी पुन्हा नानासाहेब कापडणीस यांच्या मोबाईलवर फोन केला असता, संशयित राहुल याने तो उचलला आणि शीतल यांची भेट घेतली. त्याने शीतल यांना ‘बंगल्याचे काम सुरू असल्यामुळे तुमचे वडील, भाऊ हे देवळाली कॅम्प येथील रो-हाऊसमध्ये शिफ्ट झाले आहे’ असे सांगितले. त्याच्या बोलण्याचा विश्वास करत शीतल या पुन्हा माघारी मुंबईला निघून गेल्या. यामुळे कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांपर्यंत उशिराने पोहचली. पोलिसांनी राहुल यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNashikनाशिकDeathमृत्यूuniversityविद्यापीठArrestअटक