माजी आमदाराला कोर्टाने दिला दणका; डबल मर्डरप्रकरणी सुनावली जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:41 IST2022-04-03T19:40:34+5:302022-04-03T19:41:56+5:30
Ex-Odisha MLA gets life term for double murder : दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. न्यायालयाने साईचा ड्रायव्हर वर्धन याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली असल्याची शर्मा यांनी सांगितले.

माजी आमदाराला कोर्टाने दिला दणका; डबल मर्डरप्रकरणी सुनावली जन्मठेपेची शिक्षा
भुवनेश्वर - महिला व मुलीच्या हत्येप्रकरणी छत्तीसगड येथील न्यायालयाने छत्तीसगडचे बिजू जनता दलाचे (बीजेडी) माजी आमदार अनूप कुमार साई यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यातील पाचवे अतिरिक्त सत्र न्यायाधीश कमलेश जगदल्ला यांच्या न्यायालयाने साई यांना शिक्षा सुनावल्याचे सरकारी वकील दीपक शर्मा यांनी शनिवारी सांगितले.
७ मे २०१६ला हमीरपूर रोडवर महिला आणि मुलीची अज्ञात व्यक्तींनी चिरडून हत्या केली होती. ओडिशाचे रहिवासी असलेल्या कल्पना दास (३२) आणि मुलगी बबली अशी मृतांची ओळख मार्च २०१७ मध्ये पटली होती.
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची इंजिनिअर पतीला लागली खबर, प्रियकराच्या मदतीने केली हत्या
जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संतोष सिंह यांच्या नेतृत्वाखाली चक्रधरनगर पोलिसांनी या प्रकरणी माजी आमदार साई आणि चालक वर्धन टोप्पो यांना १३ फेब्रुवारी २०२० रोजी अटक केली होती. नंतर पोलिसांनी कोर्टात साई आणि वर्धन विरोधात खटल्यात हस्तक्षेप केला. मात्र, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने साईला कल्पना दास आणि मुलीची हत्या, गुन्हेगारी कट आणि पुरावे दडपल्याप्रकरणी दोषी ठरवले, असे शर्मा यांनी सांगितले. न्यायालयाने साईला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. न्यायालयाने साईचा ड्रायव्हर वर्धन याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली असल्याची शर्मा यांनी सांगितले.