माजी महापौरांच्या मुलाचा जळगावात खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 00:54 IST2020-11-05T00:54:38+5:302020-11-05T00:54:56+5:30

Crime News : गणेश व भुर्या नावाच्या तरुणांनी धारदार शस्त्र व लोखंडी सळईने हा खून करण्यात आला.

Former mayor's son murdered in Jalgaon | माजी महापौरांच्या मुलाचा जळगावात खून

माजी महापौरांच्या मुलाचा जळगावात खून

जळगाव : माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २८, रा. शिवाजी नगर) याचा रात्री १२ वाजता शिवाजी नगरातील उस्मानिया पार्क येथे खून झाला. घटनेची कारण अजून समोर आलेले नाही.  जखमी अवस्थेत त्याला ओम क्रिटीकलमध्ये आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत  घोषित केले. दरम्यान या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
गणेश व भुर्या नावाच्या तरुणांनी धारदार शस्त्र व लोखंडी सळईने हा खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून व खुन्नस देण्याच्या कारणावरून ही घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली.

Web Title: Former mayor's son murdered in Jalgaon