कामशेतमध्ये जुन्या भांडणातून भर रस्त्यात एकावर कोयत्याने वार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 18:40 IST2019-01-01T18:40:00+5:302019-01-01T18:40:11+5:30

कामशेत मधील पवनानगर रस्त्यावर पंचशील कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करण्यात आले.

the former issues attack on person In Kamshet | कामशेतमध्ये जुन्या भांडणातून भर रस्त्यात एकावर कोयत्याने वार  

कामशेतमध्ये जुन्या भांडणातून भर रस्त्यात एकावर कोयत्याने वार  

कामशेत : कामशेत मधील पवनानगर रस्त्यावर पंचशील कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी (दि. १) अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास पंचशील कॉलनी  परिसरातुन दिनेश दिलीप शिंदे (वय २८, रा. गावठाण, कामशेत) हा जात असताना भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारी संदर्भात त्याला समजून सांग असे सांगत सागर दत्ता यादव ( रा. पंचशील कॉलनी, कामशेत ) याने त्याच्यावर जुन्या भांडणाचा कारणावरून लोखंडी हत्याराने शरीरावर वार करण्यात आले. यात दिनेश गंभीर जखमी झाला असून वाकड येथील खासगी रुग्णालयात त्याला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अजून पोलिसात गुन्हा दाखल झाला नसून पोलीस तपास करत आहेत.

Web Title: the former issues attack on person In Kamshet